Farmer Divorce Haryana Case : एका ७० वर्षीय शेतकऱ्याने त्यांचा ४४ वर्षांचा संसार अखेर मोडित काढला. यासाठी त्याने जवळपास १८ वर्षे कायदेशीर लढा दिला. पण घटस्फोटासाठी शेतकऱ्याला जवळपास ३.१ कोटींची पोटगी द्यावी लागली. ही पोटगी देता यावी याकरता त्यांना त्यांची जमीन विकावी लागली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या जोडप्याचा २७ ऑगस्ट १९८० मध्ये लग्न झालं. त्यांना चार मुलेही झाली. यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला. परंतु, २००६ पासून या जोडप्यांत दुरावा येऊ लागला. त्यामुळे ते वेगळे राहू लागले. मानसिक क्रुरतेचं कारण देत सुभाष चंद (७०) यांनी २००६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. हरियाणातील कर्नाल कौटुंबिक न्यायालयाने २०१३ मध्ये त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हा खटला येथे प्रलंबित राहिला. अखेर त्यांना घटस्फोट मंजूर करण्यात आला.

हेही वाचा >> “तुला तिथे तरी शांती मिळेल…”, रेस्टॉरंटकडून अतुल सुभाष यांना वाहिली अनोखी आदरांजली

पोटगीसाठी जमीन विकली, दागिने दिले

सुभाष चंद यांचे वकिल राजिंदर गोयल म्हणाले, या करारात डिमांड ड्राफ्टद्वारे २.१६ कोटी रुपये, पीक विक्रीतून रोख ५० लाख रुपये, सोन्या-चांदीचे दागिने ४० लाख रुपये पोटगी म्हणून देण्यात आली.

पोटगी दिल्यानंतर सुभाष चंद यांच्या इतर मालमत्तांवरील हक्क पत्नी संतोष कुमारी (७३) आणि तिच्या मुलांनी सोडला आहे. त्यामुळे, सुभाष चंद यांच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलांना त्यांच्या मालमत्तेवर दावा करता येणार नाही.