अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावर केलेल्या आरोपांवर टीका करतानाच केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी सोमवारी नवा वाद निर्माण केला. ‘७१ लाख ही एखाद्या केंद्रीय मंत्र्यासाठी अतिशय किरकोळ रक्कम आहे,’ असे सांगत वर्मा यांनी खुर्शीद यांचा बचाव केला. मात्र, त्यांच्या या विधानाने नवे वादंग निर्माण झाले आहे. सलमान खुर्शीद यांच्या झाकीर हुसैन ट्रस्टने ७१ लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना वर्मा म्हणाले,‘खुर्शीद हे जबाबदार व्यक्ती आहेत. ते जेव्हा म्हणतात की यात काही घोटाळा नाही, तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. खुर्शीद यांच्यासारखी व्यक्ती ७१ लाख रुपयांच्या किरकोळ रकमेसाठी असे काही करेल, असे वाटत नाही. जर ते ७१ करोड रुपये असते तर मी थोडा गांभीर्याने विचार केला असता.’
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2012 रोजी प्रकाशित
केंद्रीय मंत्री वर्माची मुक्ताफळे
अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावर केलेल्या आरोपांवर टीका करतानाच केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी सोमवारी नवा वाद निर्माण केला. ‘७१ लाख ही एखाद्या केंद्रीय मंत्र्यासाठी अतिशय किरकोळ रक्कम आहे,’ असे सांगत वर्मा यांनी खुर्शीद यांचा बचाव केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-10-2012 at 05:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71 lakh amout to small for salman khurshid