पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर (जोगीण) सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
याप्रकऱणी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांची चौकशी करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात तपास सुरु असल्याचे नादिया पोलीस अधीक्षक अर्णव घोष यांनी ही माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळालेल्या माहितीनुसार या आठ जणांना अटक करण्यात आल्याचे कळते. तसेच, सदर घटनेला बळी पडलेल्या नन यांना रानाघाट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते रनाघाट विभागातील स्थानिक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये रात्री हे दरोडेखोर घुसले व त्यांच्यापैकी तीन ते चार जणांनी या ननवर सामूहिक बलात्कार केला. या टोळक्याने कपाटातील १२ लाख रुपयेही चोरून नेले. दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी रास्ता रोको व रेल रोको आंदोलन केले.
नन बलात्कार प्रकरणी आठ जणांना अटक
पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर (जोगीण) सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
First published on: 15-03-2015 at 03:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71 yr old nun raped in west bengal eight persons detained