पश्चिम बंगालमध्ये ७२ वर्षीय ननवर (जोगीण) सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

याप्रकऱणी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांची चौकशी करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात तपास सुरु असल्याचे नादिया पोलीस अधीक्षक अर्णव घोष यांनी ही माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळालेल्या माहितीनुसार या आठ जणांना अटक करण्यात आल्याचे कळते. तसेच, सदर घटनेला बळी पडलेल्या नन यांना रानाघाट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  अधिकाऱ्यांच्या मते रनाघाट विभागातील स्थानिक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये रात्री  हे दरोडेखोर घुसले व त्यांच्यापैकी तीन ते चार जणांनी या ननवर सामूहिक बलात्कार केला. या टोळक्याने कपाटातील १२ लाख रुपयेही चोरून नेले. दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी रास्ता रोको व रेल रोको आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा