मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला. या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर मोदी सरकारमध्ये आता ७८ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. या केंद्रीय मंत्रीमंडळात नव्याने सामिल झालेल्या १९ मंत्र्यांचे सरासरी उत्पन ८.७३ कोटी इतके आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रटीक रिफॉर्मच्या (ADR) आभ्यासानुसार, मोदी सरकारमधील ७८ मंत्र्यापैकी तब्बल ७२ मंत्री हे कोट्याधीश आहेत. तर २४ मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत. निवडणुकीचा अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथ पत्रात या २४ मंत्र्यांनी आपल्यावर असणाऱ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ADR च्या आकडेवारीनुसार, सध्याच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे एकंदरीत सरासरी उत्पन आता १२.९४ कोटी इतके झाले असून यामध्ये ४४.९० कोटी संपत्ती घोषीत करणारे मध्यप्रदेशचे राज्यसभा सदस्य एम अकबर सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत. त्यांच्यानंतर पीपी चौधरी (३५.३५ कोटी) आणि विजय गोयल (२९.९७ कोटी) या राजस्थानमधील राज्यसभा सदस्य असणाऱ्या मंत्र्यांचा नंबर लागतो. तर पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे ६०.९७ लाख संपत्तीसह सर्वात कमी संपत्ती असणारे मंत्री आहेत. विस्तारित मंत्रिमंडळात आता ३१ कॅबिनेट व ५७ राज्यमंत्री आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2016 रोजी प्रकाशित
मोदीसरकारमधील ७२ मंत्री कोट्याधीश तर २४ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
कोट्याधीशांचे केंद्रीय मंत्रीमंडळ
Written by लोकप्रभा टीम

First published on: 08-07-2016 at 21:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 72 out of 78 union ministers are crorepati