नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन अंदाजानुसार २०५० पर्यंत जगभरात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे. हा अहवाल प्रत्येकावर सारखाच परिणाम करत नसला, तरीही कर्करोगाच्या दरात अपेक्षित वाढ करणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणून हवा प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे.कर्करोगावर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ ने कर्करोगाबाबत गंभीर इशारा दिला आहे. २०२२ च्या तुलनेत २०५० पर्यंत कर्करोगाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ७७ टक्क्यांनी वाढ होईल, असे या संस्थेने म्हटले आहे. २०५० मध्ये कर्करोगाची सुमारे ३.५ कोटी नवीन प्रकरणे उद्भवू शकतात. एक फेब्रुवारीला हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. कर्करोगाच्या या वाढत्या प्रमाणामागे तंबाखू सेवन, लठ्ठपणा, मद्यपान ही प्रमुख कारणे आहेत.
मात्र, त्याहीपेक्षा वायू प्रदूषण हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. या देशांमध्ये कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये सुमारे १४२ टक्के वाढ होऊ शकते. उच्च मानवी विकास निर्देशांक असलेल्या देशांमध्ये, सुमारे ४० लाख नवीन प्रकरणे नोंदवली जाऊ शकतात. त्यामुळे कर्करोगाबद्दल जनजागृती आणि त्यावर लवकर उपचार करणे किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज येतो.या अहवालानुसार, कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या देशांवर याचा सर्वाधिक परिणाम होईल, कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यूही याच देशांमध्ये होतील.