भारतात पंधरा ते एकोणीस वयोगटातील ७७ टक्के मुलींना त्यांच्या जोडीदारांकडून लैंगिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागते, असे युनिसेफ म्हणजे यूएन चिल्ड्रेन फंडच्या अहवालात म्हटले आहे. देशातील निम्म्या मुलींचा त्यांच्या आईवडिलांकडूनच लैंगिक छळ होतो, असेही हिडन प्लेन साईट या अहवालात म्हटले आहे.
मुलांविरोधातील हिंसाचार भारतीय समाजात खोलवर मुरलेला आहे. अहवालानुसार १५ ते १९ वयोगटातील मुलींना एकदा तरी पती किंवा जोडीदाराकडून जबरी शरीरसंबंधाचा अनुभव येतो. अशा प्रकारचा लैंगिक हिंसाचार ही दक्षिण आशियात नित्याची गोष्ट आहे. पाच पैकी एका मुलीला ती विवाहित असो नसो एकदा तरी जोडीदाराकडून केल्या जाणाऱ्या लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.
बांगलादेश व भारतात हे प्रमाण जास्त आहे. विवाहितांपैकी ३४ टक्के मुलींना १५ ते १९ वयोगटात जोडीदाराने केलेल्या शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. १५ ते १९ वयोगटातील २१ टक्के मुलींना वयाच्या पंधराव्या वर्षांपासून शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तेव्हा पूर्वीचा जोडीदार वा आताचा जोडीदार हे या हिंसाचारास जबाबदार असतात, अशी माहिती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा