Independence Day Speech by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला सलग दहाव्यांदा संबोधित करत आहेत. काँग्रेस वगळता इतर पक्षाचे पंतप्रधान म्हणून दहाव्यांदा संबोधन करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आज भाषणाला सुरुवात करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आणि देशासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या सगळ्याच स्वातंत्र्य वीरांना नमन करुन देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच भारत आत्ता आपल्या अमृतकाळात आहे. जगासाठी भारत हा आशेचा किरण ठरतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपण जाणून घेऊ त्यांच्या भाषणातले प्रत्येक अपडेट्स लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Independence Day 2023 Live, 15 August 2023| Independence Day 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन, स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांना नमन

19:43 (IST) 15 Aug 2023
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणारे दोन जण अटकेत

पुणे: कोंढव्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सविस्तर वाचा...

18:49 (IST) 15 Aug 2023
धक्कादायक: पिंपरी चिंचवडमध्ये ब्लेडने वार करून मित्राची हत्या; गुप्तांग कापून मृतदेह विहिरीत फेकला

पिंपरी – चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मद्यपान करतेवेळी मित्राने शिवीगाळ केल्याने त्याची ब्लेडने वार करून दोघांनी हत्या केली.

सविस्तर वाचा...

17:45 (IST) 15 Aug 2023
बदलापुरात शिवसेना भाजप युतीचेच संकेत; खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य,भरघोस निधी देण्याची घोषणा

गेल्या काही महिन्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार कपिल पाटील आणि शिवसेना शहप्रमुख वामन म्हात्रे यांच्या शाब्दीक चकमक सुरू असल्या तरी पालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एकमेकांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

सविस्तर वाचा…

17:44 (IST) 15 Aug 2023
ठाणे जिल्ह्याच्या विकासात अनेक आव्हाने; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

मुंबईच्या शेजारी असलेला ठाणे जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासात अनेक आव्हाने आहेत. जिल्ह्याचे नागरीकरण झपाट्याने होत असून त्याबरोबरच मुरबाड, शहापूर सारखा आदिवासी भागाचा विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

सविस्तर वाचा…

17:43 (IST) 15 Aug 2023
पुणे : पर्यटन ठिकाणी जाणाऱ्यांसाठी पीएमपीकडून १०१ अतिरिक्त बसेसची सोय

स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्षानिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने प्रवाशांना पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देता यावी, यासाठी पीएमपीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

16:15 (IST) 15 Aug 2023
लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची तुफान गर्दी; सुट्टीचे औचित्य साधून लोणावळ्यात हजारो पर्यटक दाखल

लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सुट्टी असल्याने मुंबई, पुणे आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लोणावळ्यातील भुशी धरणावर शेकडो पर्यटकांनी गर्दी केल्याने भुशी धरण हाऊसफुल झाले आहे.

सविस्तर वाचा

16:10 (IST) 15 Aug 2023
यंदा ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टळला; दोन्ही गटांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या जागा बदलल्या…

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून १४ ऑगस्टला मध्यरात्री साजरा होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रमात गेल्यावर्षी शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण होते.

सविस्तर वाचा

16:04 (IST) 15 Aug 2023
घोडबंदर मार्गावर रात्रीच्या वेळेत वाहतूक बदल; तुळई बसविण्याचे कामासाठी वाहतूक बदल

मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर मार्गावरील मानपाडा आणि कासारवडवली भागात तुळई बसविण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल १८ ऑगस्टपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत हे बदल लागू असणार आहेत.

सविस्तर वाचा

15:46 (IST) 15 Aug 2023
एकतर्फी प्रेमातून कारागृहातील शिपाई महिलेला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न; वरिष्ठ कारागृह आधिकरी अटकेत

पुणे: एकतर्फी प्रेमातून कारागृहातील शिपाई महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा...

15:10 (IST) 15 Aug 2023
स्वातंत्र्यदिनी झाडांचा वाढदिवस

पनवेल: वृक्षवल्ली आम्हा सोयरे… या ब्रिदवाक्यांनी पर्यावरणासाठी झपाटलेले काही व्यापारी, सामाजिक संस्था आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन आठ वर्षांपूर्वी कळंबोली येथील लोखंड पोदाल बाजारातील रस्त्यांच्या कडेला रोपे लावून त्याचे संवर्धन केले.

सविस्तर वाचा...

14:55 (IST) 15 Aug 2023
गाडीतून धूर निघाल्याचे सांगत दुरुस्तीच्या नावाखाली फसवणूक; गुन्हा दाखल

नवी मुंबई: गाडी चालवताना जर कोणी, गाडीतून धूर निघत आहे वा अन्य काही सांगितले तर सावधान रहा! असेच कारण सांगून दुरुस्तीच्या नावाखाली एका वाहन चालकाची तब्बल २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

सविस्तर वाचा...

14:44 (IST) 15 Aug 2023
देवेंद्र फडणवीसांच्या जन्म मेडिकलमध्ये; शासकीय रुग्णालयाबाबत काय म्हणाले पहा..

नागपूरकर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालतयात (मेडिकल) झाला. जन्म झालेल्या रुग्णालयाबाबत फडणवीस काय म्हणाले आपण बघूया. मेडिकलमधील १८२ कोटी खर्चाच्या सोमवारी झालेल्या विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, माझी जन्मभूमी, कर्मभूमी नागपूर आहे. यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे.

सविस्तर वाचा

13:52 (IST) 15 Aug 2023
स्वातंत्र्यदिनी पनवेलकरांना तीन नवे आरोग्य केंद्रांची भेट

पनवेल: यंदाचा अर्थसंकल्प साजरा करताना पनवेल पालिकेच्या आयुक्तांनी यंदाच्या वर्षात पनवेलकरांच्या आरोग्यसाठी विशेष लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले होते.

सविस्तर वाचा...

13:47 (IST) 15 Aug 2023
डोंबिवलीत रामनगरमधील बालभवनला फेरीवाले, टपऱ्यांचा विळखा

आम्ही रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या बाहेर आहोत. तुम्ही आम्हाला हटविणारे कोण, असे प्रश्न हे फेरीवाले, टपरीवाले स्थानिक रहिवाशांना करत आहेत.आनंद बालभवन मध्ये अनेक उपक्रम दररोज सुरू असतात. शाळकरी मुले येथे कराटे, योगा, शरीर सुदृढतेचे अनेक प्रकार करण्यासाठी येतात. याठिकाणी पालकांची गर्दी असते.

सविस्तर वाचा

13:22 (IST) 15 Aug 2023
तब्बल अकराशे किलोची रांगोळी!

वर्धा: स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषदेने संकल्प केला. या दिवशी चार हजार चौरस फुटांची रांगोळी काढायची. चोवीस तासात हे आव्हान पेलायचे होते. पण अद्याप रांगोळी चितारणे सुरूच आहे.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 15 Aug 2023
Weather Update: आनंदवार्ता! पावसाच्या पुनरागमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार!

राज्यात १३ ऑगस्टपासून  पुन्हा एकदा पावसाळी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली असून, आता महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सविस्तर वाचा

13:02 (IST) 15 Aug 2023
डोंबिवली, कल्याणमध्ये वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहन मालक हैराण

कल्याण: घराजवळ, सार्वजनिक रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरुन नेण्याचे प्रमाण कल्याण, डोंबिवलीत वाढले आहे.

सविस्तर वाचा...

12:25 (IST) 15 Aug 2023
पुण्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा; पानशेत धरण १०० टक्के भरले

पुणे: खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. दिवसभरात पावसाने उघडीप दिली.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 15 Aug 2023
शरद पवार गुरुवारी मराठवाड्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मराठवाड्यात पहिली जाहीर सभा गुरुवारी बीड जिल्ह्यात होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून आणण्याचे चाललेले प्रयत्न, अजित पवार यांनी घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा

12:10 (IST) 15 Aug 2023
मोदींची ‘मी पुन्हा येईन’ची लाल किल्ल्यावरून गर्जना

‘देशात परिवर्तन घडवून आणण्याच्या माझ्या वचनाने मला पंतप्रधान केले. कुशल कामगिरीने मला पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी दिली. पुढील वर्षी १५ ऑगस्टला याच लालकिल्ल्यावरून मी देशाने मिळवलेले यश, तुमचे सामर्थ्य, तुमचे संकल्प, त्यामध्ये झालेली प्रगती, त्याचे गौरवगान अधिक आत्मविश्वासाने मी प्रस्तृत करेन’, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

सविस्तर वाचा

11:59 (IST) 15 Aug 2023
फडणवीस म्हणतात.. “शासकीय रुग्णालयांत आमदार- मंत्र्यांवरही उपचार व्हावेत”

नागपूर: शासकीय रुग्णालयांत सामान्यांप्रमाणेच आमदार-मंत्र्यांवरही उपचार व्हावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मेडिकल रुग्णालयातील विविध कामांचे भूमिपूजन व नूतनीकरण कार्यक्रमात ते बोलत होते.

सविस्तर वाचा..

11:45 (IST) 15 Aug 2023
जगप्रसिद्ध लोणार सरोवरात बिबट्यांनी दिले पर्यटकांना दर्शन

लोणार सरोवर परिसरात दोन बिबट्यांनी रविवारी पर्यटकांना दर्शन दिले. ‘मी लोणारकर’ चमूचे सदस्य सचिन कापुरे यांनी या दोन्ही बिबट्यांना कॅमेऱ्यात टिपले. लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले बेसाल्ट खडकातील आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे.

सविस्तर वाचा

11:44 (IST) 15 Aug 2023
उरण एज्युकेशन विद्यालय संस्थेच्या मनमानीचा पालकांकडून निषेध

उरण एज्युकेशन सोसायटी या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या विद्यालय प्रशासनाने चालविलेल्या मनमानी विरोधात पालकांनी जाब विचारत निषेध केला आहे. सोमवारी शाळेच्या व्यवस्थापना विरोधात एक होत पंचायत समितीच्या गट शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले आहे. 

सविस्तर वाचा

11:44 (IST) 15 Aug 2023
जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

पुणे: जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.

सविस्तर वाचा...

11:43 (IST) 15 Aug 2023
तलाठी भरतीसाठी १० लाख ४० हजार अर्ज; अनेकांना दूरचे केंद्र

पुणे: तलाठी भरतीसाठी यंदा विक्रमी १० लाख ४० हजार ७१३ अर्ज, परीक्षेसाठी शारीरिक विकलांग आणि महिला उमेदवारांना दिलेले प्राधान्य आणि अनेक उमेदवारांनी राज्यातील ठरावीकच जिल्हे परीक्षा देण्यासाठी निवडले आहेत.

सविस्तर वाचा...

11:42 (IST) 15 Aug 2023
भूगाव बाह्यवळण मार्गाचे काम सुकर; जागामालकांची जमिनी देण्यास सहमती

पुणे: एनडीए चौकाची अडचण सुटल्यानंतर आता पुणे-कोलाड रस्त्यावरील अत्यंत महत्त्वाच्या भूगाव बाह्यवळण मार्गाची अडचण लवकरच दूर होणार आहे.

सविस्तर वाचा...

09:59 (IST) 15 Aug 2023
Video: “जेव्हा भ्रष्टाचाराचा राक्षस देशाच्या मानगुटीवर बसला होता…”, मोदींचं काँग्रेसवर टीकास्र!

मोदी म्हणतात, “मी १० वर्षांचा हिशेब तिरंग्याच्या साक्षीनं देतोय. १० वर्षांपूर्वी राज्यांना…”

वाचा सविस्तर

09:59 (IST) 15 Aug 2023
Video: “भारतात मुली विज्ञान, इंजिनिअरिंग शिकतात का?” मोदींनी सांगितला विदेश दौऱ्यात घडलेला ‘तो’ प्रसंग!

मोदी म्हणतात, “मी त्यांना दिलेलं उत्तर त्यांच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. माझ्या देशाचं आज ते सामर्थ्य आहे”

वाचा सविस्तर

09:58 (IST) 15 Aug 2023
Video: पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर केला तीन विकृतींचा उल्लेख; म्हणाले, “यांना हरवल्याशिवाय विकास अशक्य!”

मोदी म्हणतात, “काही विकृती गेल्या ७५ वर्षांत देशात घर करून बसल्या आहेत. आपल्या समाजव्यवस्थेचा असा हिस्सा बनल्या आहेत, की…!”

वाचा सविस्तर

09:22 (IST) 15 Aug 2023
आमच्या सरकारने पाच वर्षात साडेतेरा कोटी भारतीयांना गरीबीतून वर आणलं-मोदी

आमच्या सरकारने पाच वर्षात साडेतेरा कोटी भारतीयांना गरिबीतून वर आणलं. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आम्ही विश्वकर्मा योजना आणत आहोत. १३ ते १५ हजार कोटींनी त्याची सुरुवात आणणार आहोत. पीएम किसान योजनेतून आम्ही अडीच लाख कोटी रुपये या देशाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आम्ही जलजीवन मिशनसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. आयुषमान भारत योजनेसाठी, गरीबांना उपचार मिळावेत, औषधं मिळावीत म्हणून ७० हजार कोटींचा निधी दिला आहे. पशूधन संवर्धनासाठी १५ हजार कोटी रुपये आपण खर्च केले आहेत. आज भारतीयांना मी सांगू इच्छितो की जनऔषध केंद्रांनी देशातल्या मध्यमवर्गींयांना नवी ताकद दिली. जर एखाद्याला मधुमेह झाला तर महिन्याला ३ हजार रुपये औषधं लागतात. जनऔषध केंद्रातून ते औषध आपण लोकांना दिलं आहे.

pm narendra modi no confidence motion

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण! (फोटो - पीटीआय संग्रहित)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु झालं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहाव्यांदा देशाला संबोधित करत आहेत.आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात मणिपूरचा उल्लेखही केला आहे.