येमेनची राजधानी साना येथे बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत ७८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश, पुढली तीन दशके लोकसंख्यावाढ कायम; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सानामध्ये नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांकडून नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं. मात्र, यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात ७८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

राजधानी सानाच्या जुन्या शहरात ही घटना घडली. व्यापाऱ्यांनी गरीब लोकांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र, या कार्यक्रमाचं नियोजन योग्यरित्या करण्यात आलं नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली, अशी प्रतिक्रिया हुती बंडखोर ब्रिगेडियर अब्देल खलीक अल अघरी यांनी दिली.

हेही वाचा – मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!

दरम्यान, या घटनेनंतर ज्या शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ती शाळा बंद करण्यात आली आहे. नागरिकांना आणि पत्रकारांना या भागात फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 78 killed in stampede during ramadan program in yemens capital sana spb
Show comments