एका वृद्धेनं तिची संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नावे केली आहे. यामध्ये तिची मालमत्ता आणि दागिन्यांचा समावेश आहे. या वृद्धेनं न्यायालयात तिचे मृत्यूपत्र सादर करून तिच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत. पुष्पा मुंजियाल असं या वृद्धेचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, पुष्पा मुंजियाल या उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये राहतात. त्यांचं वय ७८ वर्ष आहे. पुष्पा यांनी त्यांची ५० लाखांची संपत्ती आणि १० तोळे सोन्यासह त्यांची सर्व मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. पुष्पा मुंजियाल यांनी डेहराडून न्यायालयात एक मृत्यूपत्र सादर केले असून, त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत.

पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचं म्हटलंय. “मी राहुल गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित आहे आणि म्हणूनच माझी संपत्ती त्यांना देत आहे,” असं पुष्पा मुंजियाल म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले की, “पुष्पा मुंजियाल यांनी माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं मृत्यूपत्र आणि मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधींना दिल्याची कागदपत्रे सोपवली आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 78 year old woman transfers all her property in rahul gandhis name hrc