केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै २०२१ मध्ये महागाई भत्ता किती वाढेल याची आकडेवारी समोर आली आहे.कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये (डीए) मध्ये ३ टक्के वाढ अपेक्षित आहे. जानेवारी ते मे या कालावधीत ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (एआयसीपीआय) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात जुलैमध्ये ३ टक्क्यांनी वाढू होऊ शकते.

३१ टक्के होणार महागाई भत्ता

७ व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. शेवटच्या तीन वेळच्या महागाई भत्त्यांची एकत्र बेरीज केल्यानंतर ती २८ टक्के होणार आहे. यामध्ये जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली, त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै २०२० मध्ये ३ टक्के वाढ झाली आणि जानेवारी २०२१ मध्ये त्यामध्ये ४ टक्के वाढ झाली आहे. आता जुलै २०२१ मध्येही त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर केंद्रीय कर्मचार्‍यांना सप्टेंबरपासून ३१ टक्के महागाई भत्ता (१७ + ४ + ३ + ४ + ३) मिळेल.

कामगार मंत्रालयाने मे २०२१ साठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकातील आकडेवारी दिली आहे. यामध्ये मे २०२१ च्या निर्देशांकात ०.५ अंकांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे ते १२०.६ वर पोहोचला आहे. आता जूनच्या आकडेवारीची आहे प्रतीक्षा, परंतु त्यामध्ये मोठी वाढ होण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ हवी असल्यास ही निर्देशांक १३० असायला हवा. पण एआयसीपीआयला एका महिन्यात १० गुणांची उडी करणे अशक्य आहे. म्हणून, जुलैमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ ३ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त होणार नाही.

इतकी वाढणार रक्कम

नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे शिवा गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२१ आणि जुलै २०२१ मधील महागाई भत्ता सप्टेंबर जाहीर केला जाईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आता दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवगोपाल मिश्रा यांच्या मते, वर्ग १ मधील कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी ११,८८० ते ३७,५५४ रुपये असेल. जर स्तर -१३ म्हणजेच ७ व्या सीपीसीची मूलभूत वेतनश्रेणी १,२३,१०० वरुन २,१५,९०० रुपये किंवा १४ व्या स्तरासाठी मोजली गेली तर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी १,४४,२०० ते रू. २,१८,२०० रुपयांपर्यंत मिळू शकते.

Story img Loader