नेपाळमध्ये बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हिमालय परिसरही हादरला. हिमस्खलनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत.
नेपाळच्या गिर्यारोहण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी महत्वपूर्ण असलेले दोन बेसकॅम्प वाहून  गेले असून अनेक गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. बेसकॅम्प १ मधून १८जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एव्हरेस्ट शिखरावर स्वच्छता अभियानासाठी गेलेल्या गिर्यारोहकांच्या एका भारतीय पथकाचाही अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. हिमकडा कोसळल्यानंतर सर्व मोहिमा तूर्तास थांबवण्यात आलेल्या आहेत.

Story img Loader