श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळली आहे. सरकारविरोधी निदर्शकांनी राजपक्षे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सनथ निशांत यांच्या घराला आग लावली. एवढचं नाही तर सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांना मारहाण केल्याची देखील घटना घडली आहे. या हिंसाचारात अत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार भडकवल्याप्रकरणी महिंदा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

श्रीलंकेत नेमकं काय घडत आहे?

१. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये चकमक झाली. ज्यांनी श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाट आणून ठेवले आहे. त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जनतेने केली आहे.

२. महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी आपले पद सोडले. परंतु त्यांच्या राजीनामानंतर देशात हिंसाचार भडकला. हंबनटोटा येथील राजकीय-प्रभावशाली राजपक्षे कुटुंबाचे वडिलोपार्जित घर निदर्शकांनी पेटवून दिले. अनेक आजी-माजी मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले करून आग लावण्यात आली.

३. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या कर्मचार्‍यांना पाचारण केले आहे. सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा इतरांचे नुकसान करणाऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत. कोलंबो आणि देशाच्या इतर भागात झालेल्या हिंसाचारात जवळपास 250 लोक जखमी झाले आहेत.

४. कुरुणेगाला येथील पंतप्रधान महिंदा यांचे घरही आंदोलकांनी जाळले. तर जमावाने महिंदा आणि गोटाबाया यांचे वडील डी ए राजपक्षे यांच्या स्मरणार्थ बांधलेले – मेदामुलाना, हंबनटोटा येथील स्मारकरेही नष्ट केली आहेत.

५. श्रीलंका सरकारने देशव्यापी कर्फ्यू लागू केला आहे आणि राजधानी कोलंबोमध्ये सैन्य तैनात केले आहे.

६. राजपक्षांच्या आणि इतर राजकारण्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यामुळे ते भारतात पळून गेल्याची अटकळ पसरली. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी मंगळवारी अशा अफवांचे “बनावट आणि उघडपणे खोटे” म्हणून खंडन केले. महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या कुटुंबासह मंगळवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला आणि त्रिंकोमाली येथील नौदल तळावर आश्रय घेतल्याचे सांगण्यात आले.

७. राजपक्षांच्या आणि इतर राजकारण्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यामुळे ते भारतात पळून गेल्याची अफवा पसरली आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी मंगळवारी ही गोष्ट खोटी असल्याचे स्पष्ट केले. महिंदा राजपक्षे यांनी कुटुंबासह मंगळवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला आणि त्रिंकोमाली येथील नौदल तळावर आश्रय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

८. राजपक्षे कुटुंब आणि त्यांच्या निष्ठावंतांना देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारविरोधी निदर्शकांनी कोलंबोमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चौकी उभारली आहे.

९. श्रीलंका संसदेच्या अध्यक्षांनी मंगळवारी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना अभूतपूर्व हिंसाचार देशातील सर्वात वाईट आर्थिक संकटावर चर्चा करण्यासाठी या आठवड्यात सभागृहात येण्याची विनंती केली आहे. तसेच सरकारच्या विरोधात झालेल्या व्यापक निषेधावर चर्चा करण्यात येणार आहे.

१०. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी मंगळवारी लोकांना हिंसाचार थांबण्याचे आवाहन केले आहे.

११. आर्थिक संकटामुळे कोलंबो स्टॉक एक्स्चेंज एक आठवडा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, अडचणींमुळे मंगळवारीही एक्स्चेंजला सुट्टी घोषित करण्यात आली.

Story img Loader