8 friends deid on way to Maha Kumbh in Road Accident : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक दाखल होत आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून देखील लोक कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत. यादरम्यान राजस्थानच्या मांडलगड मतदारसंघातून महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या आठ मित्रांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुवारी जयपूरच्या जवळ ही भयानक दुर्घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठही मित्रांचे मृतदेह शुक्रवारी त्यांची मूळ गावी – बदलियास, फलासिया आणि मूकूदपुरीया येथे अंत्यविधीसाठी परत आणण्यात आले. यावेळी बदलियास गावात एकाच वेळी पाच चीता पेटल्याचे चित्र पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले.

जयपूरजवळ भीषण अपघात

आठ मित्र गुरूवारी सकाळी इको कारने महाकुंभसाठी निघाले होते. पण जयपूरजवळ त्यांचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून निघाल्याचे पाहायला मिळाले. मृतदेहाचे दूदू जिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदन केल्यानंतर आठही जणांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात आले.

गावावर शोककळा

मृतांपैकी पाच जण दिनेश, नारायण, रविकांत, किशनलाल आणि मुकेश हे बदलियास येथील होते. तर दोन जण फलासिया आणि एक जण मुकुंदपुरिया येथील होता. मृतांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील पाच तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या दु:खात बदलियास गाव पूर्णपणे बंद करण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांची गावाला भेट

भीलवरा जिल्हा अधिकारी जसमीत सिंह संधू यांनी बदलियास गावाला भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी राज्य सरकारकडून योग्य मदत केली जाईल असे आश्वासन देखील दिले. यावेळी त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एक ते दोन दिवसात मदत दिली जाईल असेही सांगितले.