करोनाचा डेल्टा व्हेरिएंट सध्या जागतिक चिंतेचे कारण बनला आहे. भारतातील लशीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंटवर ८ पट कमी प्रभाव आहे. एका अभ्यासामध्ये ही माहिती समोर आली आहे. तसेच वुहानच्या तुलनेत हा व्हेरिएंट जास्त वेगाने पसरण्याची भीती आहे. दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयासहीत देशातील अनेक रूग्णालयातील १०० आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात केंब्रिज विद्यापीठातील वैज्ञानिकही सहभागी झाले होते.

करोनाचा डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात तीसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर एका अभ्यासात चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, लशीवर केलेल्या अभ्यासानुसार, करोना लशीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंटवर ८ पट कमी परिणाम होतो. तसेच यामुळे श्वसन यंत्रणेत अधिक गंभीर संक्रमणही होते. याव्यतिरिक्त, त्याची संसर्गजन्य क्षमता देखील खूप जास्त आहे.

अधिक लोकांपर्यंत पसरण्याची भीती

अभ्यासानुसार, डेल्टा व्हेरिएंट तुलनेत वुहानच्या स्ट्रेनपेक्षा अधिक लोकांपर्यंत पसरण्याची भीती आहे. करोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये B.1.1.7 (Alpha variant) आणि B.1.617.1 (Kappa variant) कप्पा व्हेरिएंटपेक्षाही डेल्टा प्लस जास्त पसरत आहे.

डेल्टा व्हेरिएंटवर लस निष्प्रभ?

यापुर्वी दिल्लीमधल्या एका वैद्यकीय संस्थेतल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत देखील हा अभ्यास करण्यात आला. या संस्थेतल्या १८८ कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली होती. एप्रिलच्या शेवटापर्यंत जवळपास १६०० जणांचं लसीकरण पूर्ण झालं. या रुग्णालयाने सांगितलं की, लस घेतल्यानंतरही १०टक्के कर्मचाऱ्यांना करोना झाला. विषाणूच्या अधिक काळ संपर्कात असल्याने डॉक्टर आणि नर्स तसंच इतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘डेल्टा प्लस’बाबत या क्षणाला अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही – राजेश टोपे

या कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतल्यानंतर हे लक्षात आलं की ७० टक्के लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. लस घेतल्यानंतरही या विषाणूचा संसर्ग होणं ही काळजीची बाब असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सरीन म्हणतात की, लसीमुळे प्रतिपिंडे तयार झाली असली तरी सध्या देण्यात येणाऱ्या लसी या नव्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात पुरेसं संरक्षण देऊ शकणार नाहीत. त्यामुळे लस घेतल्यानंतरही दोन मास्क वापरणं अनिवार्य आहे.

Story img Loader