अमेरिकेतील मेरीलँड येथील नीव सराफ नावाच्या मुलाने नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी २६ हजार डॉलर इतकी मदत क्राउडफंडिंगच्या माध्यमातून गोळा केली आहे. नेपाळमध्ये २५ एप्रिलला ७.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.
सराफ याचे आईवडील नेपाळचे असून त्याने त्यांना त्याचे साठवलेले  पैसे पाठवण्यासंबंधी विचारले होते पण नंतर त्याने मित्रांशी संपर्क साधला असता मोठी रक्कम गोळा झाली. नंतर तो व त्याचे मित्र अमेरिकन नेपाळ मेडिकल फाउंडेशनकडे गेले व त्यांच्यासमवेत क्राउडफंडिंग पेज सुरू केले. आपल्या कुटुंबीयांचे बालपण नेपाळमध्ये गेले आहे व मातृभूमीने मदतीची हाक दिली आहे तेव्हा सर्वानी मदत करावी असे आवाहन त्याने केले होते. यात जमवलेला पैसा नेपाळमध्ये काम करणाऱ्या विश्वासार्ह धर्मादाय संस्थांना दिला जाणार आहे. नीव सराफ याने स्वत:चे ३८४ डॉलर्स यात घातले होते. नीव व त्याच्या मित्रांनी आतापर्यंत २७२७६ अमेरिकी डॉलर जमवले असून त्याने एकटय़ानेच यातील २६६७५ डॉलरची रक्कम जमवली होती. नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या ७.९ रिश्टरच्या भूकंपात ८ हजार लोक मरण पावले असून १६ हजार लोक जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा