मध्य प्रदेशातील मुरैना येथे माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली आहे. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आठ वर्षांचा मुलाला आपल्या दोन वर्षांच्या लहान भावाच्या मृतदेहासोबत अनेक तास रस्त्यावर बसावे लागले. अखरे नागरिकांनी या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुजाराम जाटव यांनी आपल्या दोन वर्षांचा मुलाला पोटात दुखल असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांचा ८ वर्षीय मुलगाही त्यांच्यासोबत रुग्णालयात होता. मात्र या मुलाची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या मृत मुलाला घरी नेण्यासाठी पुजाराम जाटव यांनी रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने कोणतीही मदत केली नाही.

पुजारामने रुग्णालयाच्या बाहेर येऊन रुग्णवाहिकेची शोधाशोध केली. या दरम्यान, त्यांचा आठ वर्षीय मुलगा आपल्या दोन वर्षाय मृत भावासोबत अनेक तास रुग्णालयाबाहेर रस्त्यावर बसला होता. अखेर नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.