Heart Attack : आठ वर्षांच्या एका मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बंगळुरुपासून १७५ किमी असलेल्या चामराज नगर तालुक्यातील बदानुप्पे गावात श्रुती-लिंगराजू यांची मुलगी तेजस्विनी वयाच्या आठव्या वर्षी मृत झाली आहे. तिच्या शिक्षिकेला तेजस्विनी वही दाखवत होती. त्यावेळी ती कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. तेजस्विनी शाळेत गेली असतानाच ही घटना घडली. ज्यानंतर हळहळ व्यक्त होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी घटना काय घडली?

तेजस्विनी नेहमीप्रमाणे तिच्या शाळेत गेली होती. शिक्षिकेला वही दाखवत असताना ती अचानक कोसळली. त्यानंतर तिला तातडीने जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तेजस्विनीला मृत घोषित केलं. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते आहे. तसंच शाळा प्रशासन आणि शाळेच मुख्याध्यापक फादर प्रभाकर यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेची माहिती मिळतात हनुमंत शेट्टी यांनीही शाळेला भेट दिली आणि विचारपूस केली. शाळेला भेट दिली आणि घडलेल्या घटनेची माहिती घेतली. जेव्हा तेजस्विनी वही दाखवायला उभी राहिली होती तेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती चक्कर येऊन खाली पडली. त्यानंतर तिला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मागच्या वर्षात अशाच दोन घटना समोर

अशीच एक घटना गेल्या महिन्यात, उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात घडली होती. शाळेत खेळाचा सरावाच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याने एका ४ वर्षाच्या मुलाचे दुःखद निधन झाले होते. शुक्रवारी हा मुलगा त्याच्या मित्रांसह शाळेच्या मैदानाभोवती दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर काही वेळातच खाली कोसळल्याची घटना घडली होती. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सप्टेंबरमध्ये, उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका ९ वर्षांच्या मुलीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद मृत्यू झाला. खेळाच्या मैदानात खेळत असताना ती कोसळली आणि लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 year old girl dies of cardiac arrest in school in bengaluru scj