वॉशिंग्टन : सुमारे ८० टक्के भारतीयांचा दृष्टिकोन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सकारात्मक असून अलीकडच्या काळात देश अधिक शक्तिशाली झाल्याचे १०पैकी सात भारतीयांना वाटत असल्याचे समोर आले आहे. ही माहिती ‘प्यू रिसर्च सेंटर’ या अमेरिकास्थित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभर ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम

AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
JPC accepts Waqf report new Delhi
विरोधकांचे असहमतीचे पत्र; वक्फ अहवाल जेपीसीने स्वीकारला
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Us president donald trump immigration orders impact on Indian
आपण सारेच ‘भय्ये’?
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप

दिल्लीमध्ये पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जी-२० शिखर परिषदेपूर्वी जगभरात केलेल्या या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जगभरात भारताबाबत सकारात्मक मानसिकता असल्याचे समोर आले आहे. जगभरात सरासरी ४६ टक्के नागरिकांचे मत भारतासाठी अनुकूल असून त्या तुलनेत ३४ टक्के जग प्रतिकूल आहे. १६ टक्के लोकांनी कोणतेही मत नोंदविलेले नाही. यामध्ये इस्रायलमध्ये भारताबाबत सर्वात चांगले मत असून तेथील तब्बल ७१ टक्के नागरिक हे भारताची भूमिका अधिक व्यापक झाल्याचे मानतात. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने फेब्रुवारी २०२० ते मे २०२२ या काळात २४ देशांमध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये ३० हजार ८६१ जणांनी सहभाग नोंदविला. भारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार १०पैकी आठ नागरिकांच्या भूमिका मोदींबाबत सकारात्मक असून यातील ५५ टक्के लोकांनी ‘अतिशय सकारात्मक’ असल्याचे मत नोंदविले आहे. मोदींबाबत नकारात्मक मते असलेल्यांचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.

Story img Loader