बरेच लोक स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत, हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला स्मार्टफोनमध्ये गुंतलेली लोक आपण पाहतच असतो. पण लोकांचं स्मार्टफोनमध्ये गुतलेलं प्रमाण किती आहे? याची आकडेवारी खूप वेगवेगळी आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने याबाबत एक सर्व्हे केला आहे. ज्याची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या अहवालानुसार भारतातील ८४ टक्के लोक सकाळी उठल्या उठल्या १५ मिनिटांच्या आत आपला स्मार्टफोन तपासतात. तसेच दिवसभरातला ३१ टक्के वेळ लोक स्मार्टफोनवर घालवतात आणि दिवसांतून सरासरी ८० वेळी लोक आपला मोबाइल तपासतात.

स्मार्टफोनचा अतिवापर करणे थांबवा, नाहीतर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; तज्ज्ञांकडून जाणून घेऊ याबाबतची सविस्तर माहिती

स्ट्रिमिंग कंटेटवर अधिक वेळ जातोय

‘स्मार्टफोनच्या अनुभवाची पुनर्कल्पना: फोन अधिक स्मार्ट बनवण्यात ‘सरफेसेस’ महत्त्वाची भूमिका कशी बजावतात’ (Reimagining Smartphone Experience: How ‘Surfaces’ can play a key role in making the phone smarter) अशा लांबलचक नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बरेचसे लोक स्मार्टफोनवर ५० टक्के वेळ स्ट्रिमिंग कंटेटवर घालवतात.

विश्लेषण: कोणत्या वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ देणे योग्य? पाश्चिमात्यांच्या संशोधनातून काय दिसून आले?

मोबाइलवर घालवणारा वेळ वाढला

स्मार्टफोनवर घालविण्यात येणाऱ्या वेळेतही वाढ झाल्याची आकडेवारी अहवालातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. २०१० साली सरासरी दोन तास स्मार्टफोनवर घालवले होते, त्यात वाढ होऊन आता ४.९ तासांचा वेळ स्मार्टफोनवर घालवला जातो. विशेष म्हणजे २०१० साली, मोबाइलवर बोलणे किंवा मजकूराच्या रुपातील संदेश पाठविण्यासाठी १०० टक्के वेळ वापरला जात होता. मात्र २०२३ मध्ये बोलणे आणि मेसेज करणे यासाठी फक्त २०-२५ टक्के वेळ वापरला जातो.

स्मार्टफोनच्या वापराबाबत समाजीकरणाने दुसरे स्थान पटकावले आहे. त्यानंतर सर्चिंग, गेमिंग, शॉपिंग, ऑनलाईन व्यवहार आणि बातम्यांचा क्रमांक लागतो. १८-२४ वयोगटातील मुलं ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांपेक्षा इन्स्टाग्राम रिल्स, यूट्यूब शॉर्ट्स इत्यादीसारख्या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ पाहण्यात जास्त वेळ दवडत असल्याचे दिसत आहे.

फोनवर बोलण्यासाठी कोणता कान वापरावा? डावा की उजवा…? वाचा संशोधकांचा सल्ला

गरजेपेक्षा जास्तवेळा मोबाइल हाताळला जातो

या अहवालात असेही दिसून आले की, दोनपैकी एक वेळा गरज नसताना लोक सवयीमुळे त्यांचा फोन उचलून पाहत असतात. स्मार्टफोनचे लोकांच्या जीवनातील महत्त्व वाढल्याचे अधोरेखित करताना अहवालात असे म्हटले की, चावी किंवा पाकिटापेक्षाही आता मोबाइल अधिक महत्त्वाचा झाला आहे. तसेच भारतात डेटा पॅक स्वस्त झाल्यामुळे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पेक्षाही अधिक प्रमाणात स्मार्टफोनवर इंटरनेट वापरले जात आहे.

Story img Loader