Saudi Arabia Road Accident: सौदी अरेबियाच्या जीजान येथे एका रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जेद्दा येथील भारतीय दूतावासातील मुत्सद्दी अधिकाऱ्यांनी अपघात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय दूतावासाने सांगितले की, अपघातात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सदर माहिती दिली जात आहे, तसेच त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाणार आहे. भारतीय दुतावासाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “सौदी अरेबियाच्या पश्चिम क्षेत्रातील जीजान येथे झालेल्या रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भारताचे वाणिज्य दूतावास या प्रकरणी पूर्ण सहकार्य करत आहे. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा. पुढील चौकशीसाठी हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेल्पलाईन क्रमांक –

8002440003 (Toll free)
0122614093
0126614276
0556122301 (WhatsApp)

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून एक्सवर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे.

“सौदी अरेबियातील अपघात आणि जीवितहानीबद्दल ऐकून दुःख झाले. जेद्दामधील भारताच्या दूतावासाशी बोललो. तेथील अधिकारी संबंधित कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. या दुःख परिस्थितीत ते मृतांच्या नातेवाईकांना संपर्ण सहकार्य करत आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 indians killed in road accident in saudi arabia eam jaishankar offers condolences kvg