चीनच्या पूर्वेकडील शानडोंग प्रांतातील एका कोळशाच्या खाणीत पाणी घुसल्याने नऊजण ठार झाले असून एक बेपत्ता झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच सदर खाणीत पाणी शिरले, असे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या घटनेचे वृत्त कळताच तातडीने मदतकार्य पथक रवाना करण्यात आले असून खाणमालक आणि अन्य संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader