पीटीआय, कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या सीमेवरील इग्रा या गावातील फटाक्याच्या बेकायदा कारखान्यात मोठा स्फोट झाला. त्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आणि सातजण जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतांच्या नातेवाईकांना अडीच लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल आणि जखमींना एक लाख रुपये दिले जातील असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना त्यांच्या भागातील कोणत्याही बेकायदा फटाका कारखान्यांची माहिती असेल तर त्यांनी त्याबद्दल माहिती द्यावी असे आवाहन राज्याचे पर्यावरणमंत्री मानस राजन भुनिया यांनी केले, तसेच अशा कारखान्यांविरोधात कठोर उपाय करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

  वरिष्ठ भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे (एनआयए) केली जावी अशी मागणी केली. तर अशा चौकशीला काहीच हरकत नाही मात्र सीआयडीने तपास आधीच सुरू केला असल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. या कारखान्याच्या मालकाला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. मंगळवारच्या स्फोटानंतर तो शेजारील ओदिशामध्ये पळून गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या स्फोटाचा परिणाम इतका मोठा होता की, हा कारखाना असलेली इमारत पूर्ण कोसळली अशी माहिती पोलिसांनी दिली. हा कारखाना एका निवासी इमारतीमध्ये सुरू होता.