भारताची राजधानी दिल्लीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ४६ वर्षीय व्यक्तीनं ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडित मुलीला आमिष दाखवून कारखान्यात घेऊन जात हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत सीलमपूर परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मोहम्मद शाजिद असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील बेगूसराईजवळील नरवाडा गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी ९ वर्षीय पीडित मुलगी रस्त्यावर खेळत होती. दरम्यान आरोपीनं तिला आमिष दाखवत कारखान्यात घेऊन गेला. याठिकाणी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सीलमपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Neil Gaiman sexual misconduct
Who is Neil Gaiman: ‘लहान मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार’, ८ महिलांचे प्रसिद्ध लेखकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Three arrested in rape molestation cases
बलात्कार, विनयभंगातील तीन आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच सीलमपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पीडित मुलीला जेपीसी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सीलमपूर पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत सीलमपूर भागातून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, “आरोपी शाजिद हा पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरातील एका कंपनीत काम करतो. तो पीडित मुलीच्या ओळखीचा आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी रस्त्यावर खेळत होती. त्यानंतर आरोपीनं आमिष दाखवत पीडितेला कारखान्यात घेऊन जात बलात्कार केला आहे. पीडित मुलगी लहानपणापासून मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सीलमपूर पोलीस करत आहेत.

Story img Loader