ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी बुधवारी इंग्लडमध्ये निर्बंध लागू करण्याचा सरकारचा निर्णय योग्य असल्याचा युक्तीवाद करताना देशामध्ये नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांनी करोना लसीचा बुस्टर डोस घेतला नव्हता अशी माहिती दिलीय. एका लसीकरण केंद्राच्या पहाणीसाठी पोहचलेल्या पंतप्रधानांनी लोकांना बूस्टर डोस घेण्याची मागणी केलीय. देशातील नागरिकांपैकी बरेच जण सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी बूस्टर डोस घेतला, नव्हता असं पंतप्रधाना म्हणाले आहेत.
सेंट्रल इंग्लडच्या मिल्टन कीनेसमध्ये पंतप्रधानांनी संवाद साधता तिसऱ्या डोससंदर्भातील माहिती दिली. “मी डॉक्टरांसोबत चर्चा केली आहे. त्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार सध्या आयसीयूमध्ये अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ज्यांनी लसीचा तिसरा डोस घेतला नव्हता,” असं जॉन्सन म्हणाले.
नक्की वाचा >> एक दोन नाही तर त्याने तब्बल आठ वेळा घेतली करोनाची लस… कारण ऐकून पोलिसही चक्रावले
ज्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लगाण्याची शक्यता आठ टक्क्यांनी अधिक असते, असा इशाराही जॉन्सन यांनी दिलाय. यूनायटेड किंग्डममध्ये करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. युरोपमध्ये करोनामुळे १ लाख ४८ हजार २१ जणांनी करोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत.
नक्की पाहा हे फोटो >> करोना..??? ते काय असतं?, असा प्रश्न तुम्हालाही BJP नेत्याच्या पुत्राच्या लग्नातील हे फोटो पाहून पडेल
आतापर्यंत देशातील ३२.५ मिलियन लोकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहितीही पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली. जॉन्सन यांनी २.४ मिलियन लोकांना आवाहन केलं आहे की ज्यांना लसीचे दोन्ही डोस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेलाय त्यांनी बूस्टर डोस घ्यावा.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण : ‘डेल्मिक्रॉन’ म्हणजे काय? तो किती घातक आहे?, भारतीयांना त्याचा धोका किती?
एका अहवालानुसार देशामध्ये करोना लसींचे दोन्ही डोस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटलेल्या आणि करोना लसीच्या बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या २४ लाख लोकांनी अद्याप तिसरा डोस घेतलेला नाही, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. या २४ लाख लोकांनी पुढाकार घेऊन बूस्टर डोस घ्यावा अशी विनंतीही पंतप्रधानांनी केलीय.
नक्की वाचा >> Coronavirus: वुहान लॉकडाउननंतरचा चीनचा सर्वात मोठा निर्णय; १ कोटी ३० लाख लोकसंख्येचं संपूर्ण शहरच केलं क्वारंटाइन
“ओमायक्रॉन व्हेरिएंट हा आता मोठं संकट म्हणून समोर येत आहे. रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे,” असं पंतप्रधान म्हणालेत. बूस्टर डोस न घेतलेल्यांपैकी अनेकांना उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल करावं लागत असल्याचंही जॉन्सन म्हणालेत.
नक्की वाचा >> अमेरिकेत साडेसात लाख कोटींचा COVID-19 Relief Funds घोटाळा
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून रुग्णालयांमध्ये करोना उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नाताळ्याच्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांची खरी संख्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.