अमेरिकेच्या ग्वांटानामो बे तुरुंगातील युद्धकैद्यांनी आपल्याला अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकल्याच्या निषेधार्थ १४ जणांनी सुरू केलेल्या उपोषणकर्त्यांची संख्या आता ९२ वर पोहोचली असल्याची माहिती वॉशिंग्टनच्या प्रवक्त्यांनी दिली.
या तुरुंगात एकूण १६६ कैदी असून उपोषणकर्त्यांपैकी दोघाजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारीपासून कैद्यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले असून त्याला वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. कैद्यांच्या वकिलांनी तर सरकारी आकडा चुकीचा असून उलट सुमारे १३० कैदी उपोषणात सहभागी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान १३ एप्रिल रोजी दोघा कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्तास व्हाइट हाउसच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला आहे.
ग्वांटानामो तुरुंगातील ९२ कैद्यांचे उपोषण
अमेरिकेच्या ग्वांटानामो बे तुरुंगातील युद्धकैद्यांनी आपल्याला अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकल्याच्या निषेधार्थ १४ जणांनी सुरू केलेल्या उपोषणकर्त्यांची संख्या आता ९२ वर पोहोचली असल्याची माहिती वॉशिंग्टनच्या प्रवक्त्यांनी दिली.
First published on: 26-04-2013 at 05:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 92 prisoner on hunger strike in guantanamo bay prison