पाकिस्तानने २०१३ या एका वर्षामध्ये भारतासोबत ९६ वेळा शस्त्रसंधीचे उल्ल्ंघन केले. आठ वर्षांमधील हा आकडा सर्वात मोठा असून, गेल्या वर्षभरामध्ये सीमेवरील भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरीवस्तीला पाकिस्तानी सैन्याने लक्ष केले आहे.  
“शस्त्रसंधीला हरताळ फासत पाकिस्तानी सैन्याने एकट्या सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. वर्षभरामध्ये ९६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानने मागील आठवर्षांमधील शस्त्रसंधी उल्लंघनाचा उच्चांक गाठला आहे.” असे लष्कराचे प्रवक्ते एस.एन.आचार्य यांनी सांगितले.   
या वर्षी जम्मू-कश्मिरच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर आणि आंतराष्ट्रीय सीमेवर पुंछ भागामध्ये पाक सैन्याने केलेल्या गोळीबारीमुळे सतत तणाव राहिला. ६ ऑगस्ट नंतर पाकिस्तानच्या बाजूने सीमेवर रोजच गोळीबार करण्यात आला असल्याचे भारतीय सैन्याचे प्रवक्ते म्हणाले.  

Story img Loader