शिक्षणाला वय नसतं फक्त आवड असावी लागते. हेच केरळमधल्या कारथियानीअम्मा कृष्णापिल्ला या ९६ वर्षीय महिलेने सिद्ध केले आहे. कारथियानीअम्मा केरळच्या साक्षरता आयोगाकडून चौथ्या इयत्तेसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परिक्षेत सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळवून राज्यातून पहिली आली आहे. उद्या एक नोव्हेंबर रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन मेरीट प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलाप्पूझा जिल्ह्यातील मट्टम गावात रहाणारी कारथियानीअम्मा कधीही शाळेत गेली नाही. ती घराजवळच्या काही मंदिरांमध्ये साफसफाईचे काम करायची. केरळमध्ये चौथी, सातवी, दहावी, अकरावी आणि बाराव्या इयत्तेसाठी एक समान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४३,३३० विद्यार्थी बसले होते. त्यात ४२,९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कारथियानीअम्मा चौथ्या इयत्तेच्या परीक्षेमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवून राज्यात पहिल्या आल्या असे साक्षरता मिशन यंत्रणेच्या संचालक पीएस श्रीलथा यांनी सांगितले.

आम्हाला सर्वांन कारथियानीअम्माचा अभिमान आहे. ती स्वेच्छेने वर्गामध्ये यायची असे श्रीलथा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. यावर्षी २६ जानेवारी २०१८ रोजी केरळच्या साक्षरता आयोगाने राज्यात १०० टक्के साक्षरता आणण्यासाठी ‘अक्षरालक्षम’ प्रकल्पाची सुरुवात केली. मला चांगले गुण मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. आता मला लिहिता, वाचता येते तसेच अंकही मोजता येतात असे कारथियानीअम्माने सांगितले. कारथियानीअम्माची १२ वर्षांची नात अपर्णा आणि ९ वर्षांची नात अंजना या दोघींनी तिला शिक्षणासाठी मदत केली. आमच्या काळात मुली शाळेत जात नव्हत्या. जेव्हा माझी ५१ वर्षांची धाकटी मुलगी २०१६ साली दहावीच्या पात्रता परिक्षेत पास झाली तेव्हा मी ही परीक्षा आव्हान म्हणून स्वीकारली असे कारथियानीअम्माने सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 96 year old kerala woman tops literacy mission exam