Chandrayaan 3 Landing : भारताचं मिशन मून अर्थात चांद्रयान ३ आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या तयारीत आहे. चांद्रयानाचं लँडिंग होण्याआधीची २० मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. चांद्रयान ३ चं यशस्वी लँडिंग व्हावं यासाठी देशभरात प्रार्थना केल्या जात आहेत. इस्रोच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान उतरण्याआधीच्या २० मिनिटांना टेरर ट्वेंटी असं म्हटलं आहे. या मोहिमेशी संबंधित १० मुद्दे आपण जाणून घेऊ.
१) आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ चं लँडिंग संपूर्ण देशभरात या मोहिमेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे. या मोहिमेसाठी शाळा सुरु असणार आहेत. त्याचप्रमाणे खगोल प्रेमी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची वाट पाहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण अफ्रिकेत गेले आहेत. तिथे त्यांनी ब्रिक्स संमेलनात सहभाग घेतला आहे. चांद्रयान मोहिमेशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्चुअली जोडले जाणार आहेत.
२ ) रशियाचं मिशन लूना २५ अयशस्वी झालं आहे. त्यामुळे इस्रोचं टेन्शन थोडं वाढलं आहे. मिशन लूना हे रविवारी चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलं.
३) इस्रोने चांद्रयान मोहिमेविषयी हा विश्वास व्यक्त केला आहे की चांद्रयान ३ चं लँडिंग यशस्वी होईल. कारण चांद्रयान २ च्या अपयशातून आम्ही खूप काही शिकलो आहोत. ती सगळी काळजी घेऊनच ही मोहीम आखली आहे.
४) चांद्रयान मोहिमेचं लाइव्ह टेलिकास्ट संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरु होईल. युट्यूब चॅनल आणि डीडीवरही हे टेलिकास्ट दाखवण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरेल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हे पण वाचा- Chandrayaan-3 : दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी चांद्रयान लँडिंग कार्यक्रमात सहभागी होणार का?
५) चांद्रयान ३ चं लँडिंग कुठे होणार आहे त्याची निवड अत्यंत सावधगिरी बाळगून करण्यात आली आहे. चंद्राच्या या भागात पाणी असल्याचं शक्यता आहे. ते अंश जर आढळले तर आपल्यासाठी ते महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचं चांद्रयान १ च्या मोहिमेत नासाच्या एका उपकरणाद्वारे कळलं होतं.
६) चंद्रावर पाणी आढळलं तर ते भविष्यातल्या चांद्रयान मोहिमेसाठी आशेचा किरण ठरू शकतं. या पाण्याचा उपयोग उपकरणं थंड करण्यासाठी आणि ऑक्सिजन निर्मितीसाठी होऊ शकतो. तसंच महासागरांच्या उत्पत्तीचं रहस्यही उलगडू शकतं.
७) रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनंतर विक्रम लँडर उतरवणारा चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान ३ ची तयारी २०२० पासूनच सुरु झाली होती. २०२१ मध्ये हे लाँचिंग होणार होतं. मात्र कोव्हिडमुळे ही मोहीम लांबली.
८) इस्रोने मंगळवारी हे सांगितलं की चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी होईल. इस्रोने एक ट्विटरही केलं आहे त्यात या चांद्रयानाने चंद्रापासून ७० किमी अंतरावरुन चंद्राचे फोटो काढले. जे पोस्ट करण्यात आले होते.
हे पण वाचा- Chandrayaan 3 Gold Model: कोईम्बतूरच्या कलाकाराने साकारली ‘चांद्रयान ३’ची सूक्ष्म प्रतिकृती
९) चंद्राचं लँडर १४ जुलैच्या दिवशी लाँच करण्यात आलं. त्यानंतर चांद्रयान ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत स्थिरावलं. लँडर विक्रम हे नाव विक्रम साराभाई यांच्या नावे देण्यात आलं आहे.
१०) चांद्रयान मोहिमेनंतर इस्रोच्या इतरही महत्त्वाच्या योजना आहेत. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक मोहीम आखली जाणार आहे. आदित्य एल १ असं या मोहिमेचं नाव असणार आहे.