पीटीआय, बंगळूरु : ISRO Chandrayaan-3 Moon Mission Landing ४१ दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्यासाठी इस्रोचे संशोधक सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडरचे चंद्रपृष्ठावर अवतरण करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले. ‘चंद्रयान-३’ ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण करणारा भारत चौथा देश बनणार आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया या देशांच्या अंतराळ यानाचे चंद्रपृष्ठावर अवतरण करण्यात आले आहे. २०१९ मध्ये अपयशी ठरलेल्या ‘चंद्रयान-२’चीच पुढील मोहीम म्हणून ‘चंद्रयान-३’ मोहीम आखण्यात आली होती.

चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि अलगद अवतरण, चंद्राचा अभ्यास आणि वैज्ञानिक प्रयोग करणे ही या मोहिमेची वैशिष्टय़े आहेत. अवतरणापूर्वी विक्रम मॉडय़ूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त अवतरण स्थळी सूर्योदयाची प्रतीक्षा केली जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण करण्यापूर्वी ५.४५ वाजता अवतरणाची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे, असे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले.

अडचणी आल्यास अवतरण लांबणीवर

‘चंद्रयान-३’चे अवतरण बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता करणार असले, तरी काही अडचणी आल्यास अवतरणाची वेळ बदण्यात येऊ शकते, अशी माहिती इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी दिली. बुधवारी अलगद अवतरणात काही समस्या अथवा अडथळे आल्यास चंद्रपृष्ठावर यान उतरण्याची प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते, असे देसाई यांनी सांगितले. ‘इस्रो’कडून यंत्रणेची नियमित तपासणी सुरू असून सर्व काही सुरळीत सुरू आहे. बुधवारी वेळापत्रकानुसारच अलगद अवतरण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही देसाई म्हणाले.