पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना त्यांचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी भेट स्वरुपात दिलेल्या एका पक्षावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी सिद्धू यांच्याविरोधात नवी दिल्लीच्या वाईल्डलाईफ क्राइम कन्ट्रोल ब्यूरोमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पंजाबच्या वाईल्डलाईफ क्राइम कन्ट्रोल ब्यूरोचे स्वयंसेवक संदीप जैन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले, मला वर्तमानपत्रातील बातमीमधून कळाले की, पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिंद्धू यांनी पाकिस्तानातून ब्लॅक पॅट्रीज पक्षी भारतात घेऊन आले आहेत. हा पक्षी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना भेट दिला आहे.

एखादा प्राणी किंवा पक्षी भेट देणे वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२चे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळेच आपण नवी दिल्लीच्या वाईल्ड लाइफ क्राइम कन्ट्रोल ब्युरोमध्ये सिद्धू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तानातून आणलेला ब्लॅक पॅट्रिज पक्षाला इतका काळ भारतात कसे काय ठेवण्यात आले? असा सवाल करताना परवानगीशिवाय लुप्त होत असलेल्या कोणत्याही प्राण्याच्या किंवा पक्षाच्या प्रजातीला किंवा त्याच्या शरीराच्या अवशेषांना जवळ बाळगणे बेकायदा आहे. त्यामुळे तक्रारीत आपण या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे, असे जैन यांनी सांगितले.

Story img Loader