काँग्रेसने स्वतंत्र तेलंगणाच्या बाजूने कौल दिला आणि मंत्रिमंडळाला त्यावर तेलंगण निर्मितीसाठी भाग पाडले त्यामुळ सोनिया गांधींचे ऋण व्यक्त करण्यासाठी राज्यभरात सोनिया गांधींची मंदिरे उभारणार असल्याचे तेलंगणातील काँग्रेस नेत्यांनी याआधीच जाहीर केले होते. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
सोनिया गांधींच्या मंदिरातील मुर्तीसाठी एका खास शिल्पकाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने बनवलेली सोनियाम्माची मूर्ती ट्विटरवर सध्या टॉप ट्रेंडमध्ये सुरू आहे. ट्विटकरण्यात आलेल्या छायाचित्राचे शिर्षकही ‘सोनियाम्मा’ असे देण्यात आले आहे.
आपल्या राजकीय नेतृत्वावरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी भारतात राजकीय नेते विविध क्लृप्त्या शोधून काढत असतात. यावेळी तर तेलंगणातील काँग्रेस आमदाराने हद्दच केली आहे. सोनिया गांधींचे चक्क मंदिर उभारून आपल्या राजकीय नेतृत्वाला देवाचे स्थान दिले आहे. सोनिया गांधींची प्रतिकृती असणारी ही खास मूर्ती घडविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मूर्तीला पारंपारिक हिंदू देवीसारखीच रुपरेखा देण्यात आली आहे. गेल्यावर्षी ९ डिसेंबर रोजी या मंदिराच्या पायाभरणीला सुरूवात झाली आणि येत्या काही महिन्यांत मंदिराचे काम पूर्णत्वास येईल असे हे तेलंगणाचे आमदार महाशय सांगतात. 

तेलंगणात साकारण्यात आलेली सोनियाम्मांची मूर्ती-

Story img Loader