US Election 2024 Donald Trump : दिल्लीतील हिंदू धर्मगुरूंच्या एका गटाने ३ नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी होम हवन आणि प्रार्थना केली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५ नोव्हेंबर रोजी येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे एकमेव नेते आहेत जे जागतिक शांतता प्रास्थापित करू शकतात, असं हिंदू धर्मगुरू स्वामी वेदमुर्तीनंद सरवस्वती यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जुलै महिन्यात प्राणघातक हल्ला झाला होता. तेव्हावी वेदमुर्तीनंद यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना केली होती. अमेरिकेत राहणेर भारतीय आणि जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्याचं वचन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे, त्यामुळे अमेरिकेतील हिंदू समूदायाने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?

अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडणुकीत कोण जिंकणार?

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष होते. २०१७ ते २०२१ पर्यंत त्यांनी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद सांभाळलं. आता पुन्हा अमेरिकेत निवडणुका लागल्या असून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार याची साऱ्या जगाला उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी २१ जुलै रोजी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी त्यांनी पुढे केले. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी पक्षाची उमेदवारी लाभणे अत्यंत किचकट असते. अनेक प्राथमिक निवडणुकांतून उमेदवाराला पुढे जावे लागते. प्रत्येक राज्यामध्ये चांगली मते मिळवावी लागतात. पक्षाच्या प्रतिनिधींची मते मिळवावी लागतात. वर्षभराच्या या जटील प्रक्रियेनंतर कोणत्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळेल हे ठरते. मागच्या वेळी जो बायडन यांची दमछाक झाली होती. यावेळी तशी मुदतही नव्हती. परंतु एखादा चमत्कार तशी कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाली. जो बायडन यांनी कमला हॅरिस यांची उमेदवारी घोषित करताच त्यांना पसंती देण्यास डेमोक्रॅटीक पक्षात चढाओढ सुरू झाली. अवघ्या १५ दिवसांत कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटीक पक्षाची उमेदवारी लाभली.

हेही वाचा >> अमेरिकेतील प्रचार अखेरच्या टप्प्यात, कमला हॅरिस लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात ; ट्रम्प यांचा उत्तर कॅरोलिनावर भर

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला २४ तासांहून कमी काळ उरला असताना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यामान उपाध्यक्ष कमला हॅरिस तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. 

बातमी अपडेट होत आहे

Story img Loader