आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱे एक हेलिकॉप्टरला आपत्कालीनरित्या जमिनीवर उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्याशिवाय अन्या चार जण होते. आज सकाळी तामिळानाडूमधील इरोड येथील सत्यमंगलम येथील हवामान खराब होते, त्यामुळे या हेलिकॉप्टरची ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हेलिकॉप्टरमधील श्री श्री रविशंकर यांच्यासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत. लँडिंगच्या ५० मिनिटानंतर हवामान ठीक झाल्यावर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतले.