सूर्य हा आपल्याला प्रकाश देणारा तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो. या सूर्याबाबतच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्याला प्रकाश देणाऱ्या या सूर्याला एक भेग पडली आहे. तसंच सूर्यापासून सूर्याचा एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. सूर्यापासून वेगळा झालेला हा तुकडा आता सूर्याभोवतीच फिरतो आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून ही घटना पाहण्यात आली आहे. या घटनेमुळे वैज्ञानिक चकीत आणि चिंतित झाले आहेत.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काय नोंदवलं निरीक्षण?
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हे निरीक्षण नोंदवलं आहे की सूर्यापासून त्याच एक भलामोठा भाग वेगळा झाला आहे. आता हा भाग सूर्याभोवती फिरतो आहे. हा भाग वेगळा झाल्याने सूर्याला एक मोठी भेग पडली आहे असं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. या अवलोकनाबाबत वैज्ञानिक जगतात काहीसं कुतूहल निर्माण झालं आहे. तमिथा स्कोव नावाच्या हवामान विषयक संशोधकांनी ही बाब सोशल मीडियावर ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी नासाचा व्हिडिओही ट्विट केला आहे.
नेमकं काय झालं आहे याबाबत जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. अशात असंही म्हटलं जातं आह की याचा संबंध सूर्याच्या मॅग्नेटिक फिल्डसंदर्भातलाही असू शकतो. तसंच याचा संबंध ११ वर्षे चालणाऱ्या सौर चक्राशीही असू शकतो. काही अभ्यासकाचं असंही यावर म्हणणं आहे की ही घटना अनपेक्षित नाही. सौर चक्राच्या ११ वर्षांच्या कालावधीत अशी घटना घडू शकते. तसंच अशा प्रकारची घटना सौर चक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते असंही काही अभ्यासकांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
नेमकं काय पाहायला मिळालं आहे?
सूर्यापासून एक भाग वेगळा झालेला पाहण्यास मिळतो आहे. लालबुंद सूर्य आणि त्यातून बाहेर पडणारा तो भाग हे या व्हिडिओत पाहण्यास मिळतं आहे. सूर्याने आत्तापर्यंत गेल्या काही वर्षात अनेकदा वैज्ञानिकांना चकित केलं आहे. मात्र यावेळी ही नवी घटना टेलिस्कोपमध्ये पाहिली गेली आहे. सूर्याच्या उत्तर ध्रुवाजवळचा एक मोठा भाग निखळला आहे. तसंच हा तुकडा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो आहे.