आधी शौचालये, मग देवालये अशी भूमिका मांडून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आपली जातीयवादी नेता ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, बिबट्या आपल्या अंगावरील काळे ठिपके कधीच मिटवू शकत नाही, असा प्रहार कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मोदींवर केला.
नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना आधी शौचालये बांधा, नंतर मंदिरे असे वक्तव्य केले होते. त्यावरून कॉंग्रेसने त्यांच्यावर आणि भाजपवर गुरुवारी जोरदार टीका केली. दिग्विजय सिंह यांनीही गुरुवारी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ते म्हणाले, शौचालये स्वच्छ करणाऱया व्यक्तीला अध्यात्मिक आनंद मिळतो, असे मोदींनी म्हटले आहे. मोदी यांना स्वतःला असा आनंद मिळाला आहे का, त्यांनी स्वतः कधी शौचालय साफ केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा या विषयावरून त्यांनी मोदींवर प्रहार केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा