एका मद्यपी मित्रांसोबत मजेदार किस्सा घडल्याची घटना टर्कीत नोंदवली गेली आहे. एक ५० वर्षीय व्यक्ती मित्रांसोबत मद्यपान केल्यानंतर बेपत्ता झाला. यामुळे सोबतच्या मित्रांना चिंता वाटली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. जंगलात मित्र बेपत्ता झाल्याची त्यांनी पोलिसात दिली. मित्रांनी केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आणि शोधमोहीम सुरु केली. मात्र शोधमोहीम सुरु असताना असताना बेपत्ता व्यक्तीच शोधमोहीमेत सहभागी असल्याचं समोर आलं. त्यामुळे या घटनेला तासाभराच्या शोधमोहीमेनंतर मजेदार वळण लागलं.

५० वर्षीय बेहान मुतलू हा मित्रांसोबत गेला होता. मद्यपान केल्यानंतर टर्कीतील इनेगल शहराजवळील हयाका ग्रामीण भागातून बेपत्ता झाला. मद्यधुंद अवस्थेत जंगलात भरकटल्याने मित्रांना धास्ती वाटली. त्यामुळे मित्रांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलिसांची एक टीम जंगलात गेली आणि बेपत्ता असलेल्या बेहानला जोराजोरात आवाज देऊ लागले. मात्र दारूच्या नशेत मुतलू त्यांच्यासोबत असल्याचं तासाभरानंतर लक्षात आल्याने पोलिसांना धक्काच बसला. इतर कुणाला तरी शोधत असल्याचं मुतलू याला वाटल्याने तो या शोधमोहीमेचा भाग झाला होता. जेव्हा पोलिसांनी मुतलू याच्या नावाने आवाज देण्यास सुरुवात केली. तेव्हा मुतलू त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला “कुणाला बोलवत आहात, मी तर इथे आहे”. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुतलू पोलिसांसोबत दिसत आहे.

पोलिसांनी मुतलू असल्याची शहनिशा केल्यानंतर त्याला घरी सोडले आणि प्रकरण मार्गी लागल्याचं अहवालात नमूद केलं.

Story img Loader