दिल्लीच्या रोड शोमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीपवर चढून एकाने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. हा रोड शो दिल्लीच्या मोती नगर भागात सुरू होता. त्याचवेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने या माथेफिरूला ताब्यात घेतलं आहे. लोकसभा निवडणुकांसाठी अरविंद केजरीवाल प्रचार करत होते. ते जीपवर उभे होते त्याचवेळी एका माणसाने जीपवर चढत त्यांच्या थोबाडीत ठेवून दिली. ज्यानंतर थोबाडीत देणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान विरोधी पक्षांकडूनच हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप आपने केला आहे. पोलीस यासंबंधी पुढील चौकशी करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man slaps delhi chief minister arvind kejriwal during his roadshow in moti nagar area