Man Stuck in Lift in Kerala : उपचारांसाठी रुग्णालयात जावं आणि रुग्णालयातूनच नवं दुःखणं घेऊन यावं असा धक्कादायक प्रकार केरळच्या तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये घडला आहे. पाठदुखीच्या त्रासासाठी रुग्णालयात गेलेले रवींद्रन नायर हे या कॉलेजच्या लिफ्टमध्ये जवळपास ४२ तात अडकून पडले होते. या ४२ तासांत त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावं लागलं. धक्कादायक म्हणजे बंद पडलेल्या लिफ्टमध्ये कोणी (Man Stuck in Lift) अडकलंय याची जाणीवही बाहेर कोणाला नव्हती. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“ही घटना म्हणजे डोळ्यांसमोर मृत्यू पाहण्यासारखं होतं. अशा काळात तुम्हाला फक्त तुमच्या कुटुंबाची आणि पालकांची आठवण येते. त्यांच्या आठवणीत मी रडू लागलो”, असं रवींद्रन नायर म्हणाले. अशा परिस्थितीतही मी स्वतःला जिवंत ठेवण्याची आशा केली होती.

रवींद्रन नायर हे शनिवारी दुपारी रुग्णालयात गेले. डॉक्टरांच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी लिफ्टचा आधार घेतला. “अचानक लिफ्ट जमिनीवर कोसळली. यामुळे धडकेने माझा फोन तुटला. स्वतःचा जीव वाचवण्याकरता मी प्रयत्न करू लागलो. बराच वेळ झाला. हळूहळू रात्र आहे की दिवस हेही मला समजेनासे झाले. पण मी दर काही मिनिटांनी आपत्कालीन घंटा वाजवत राहिलो. आत अंधार होता. एका पोकळ जागेतून हवा येत होती, त्यामुळे मी जिवंत राहू शकलो”, अशी आपबिती त्यांनी (Man Stuck in Lift) सांगितली.

हेही वाचा >> Video: शेतकरी अचानक जमिनीवर झोपून गोल फिरत ओरडू लागला; जिल्हाधिकारी कार्यालयात सारेच बुचकळ्यात, नेमकं झालं काय?

“त्या ४२ तासांत, मी फक्त आशा करत राहिलो लिफ्टच्या नादुरुस्तीबाबत कर्मचाऱ्यांना कळेल आणि ते दुरुस्त करायला येतील”, असं ते म्हणाले. या घटनेनंतर, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही लिफ्ट बंद होती असा दावा केला आहे. परंतु, लिफ्ट बंद असतानाही त्यावर कोणताही बोर्ड नव्हता अता प्रतिदावा नायर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लिफ्ट कार्यरत नव्हती हे रुग्णालय प्रशासनाने तपासले का नाही?

नायर अनेकदा कार्यालयीन कामामुळे उशिरा घरी यायचे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नायर यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांची पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली. “रुग्णालय प्रशासनाची ही मोठी चूक आहे. माझे वडील त्यांच्या चांगल्या कर्मामुळे जिवंत आहेत. हे निव्वळ नशीब आणि देवाची कृपा होती. आपत्कालीन बेल वाजत नव्हती तर त्याचा उपयोग काय? लिफ्ट कार्यरत आहे की नाही, याची कोणालाच पर्वा नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेले हे रुग्णालय आहे. त्यांची लिफ्ट रुग्ण वापरतात म्हणून नियमितपणे काम करत आहेत की नाही हे प्रशासनाने तपासू नये?” असा संताप रवींद्रन यांचा मुलगा शंकर यांनी केला.

शंकर म्हणाले की सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याने लिफ्ट तपासण्याचे ठरवले. पाणी, अन्न नसताना आणि अंधारात माझे वडील राहिले. त्यांनी आतमध्येच शौचही केली. माझ्या वडिलांना काय सहन करावे लागले याचा विचार करणे देखील अत्यंत क्लेशकारक आहे.”

Story img Loader