गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्तीही भविष्यात कॉंग्रेस अध्यक्ष होऊ शकते, असं माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. कांग्रेस पक्षाचे मनोबल खचले आहे आणि संघटनात्मक बदलांसाठी पक्षाच्या नेतृत्वाकडून तात्काळ पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले.
चिदंबरम पुढे म्हणाले की, सोनिया गांधी जोपर्यंत कांग्रेसच्या अध्यक्ष आहेत, त्या पक्षात सर्वोच्च स्थानावर असतील. तसेच सोनिया गांधी यांना पक्षात आदराचे स्थान असून तरूणांमध्ये राहुल गांधी लोकप्रिय आहेत.
कॉंग्रेस पक्षाची पुर्नबांधणी करण्याची आवश्कता असून ती लवकरात लवकर होण्याची गरज आहे. तसेच सोनिया आणि राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमे आणि जनतेसोबत अधिकाधिक संवाद साधावा, अशी मागणी आपण या दोघांनाही करणार असल्याचं, चिदंबरम पुढे म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा