इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध ताणले गेले असून पुन्हा एकदा नरसंहार सुरू झाला आहे. दरम्यान, देशातील वातावरण कितीही दहशतीखाली असलं तरीही एका जोडप्याने आपल्या आनंदाचा क्षण एकदम खास केला. आजूबाजूला हवाई हल्ले होत असतानाही एक जोडपं बंकरमध्ये नृत्याचा आस्वाद घेत होते.

क्रिस्टिरे आणि शॉन गिब्सन यांनी अमेरिकेत त्यांचं लग्न आयोजित केलं होतं. परंतु, लग्नासाठी जे हॉटेल बुक केलं होतं, त्याचं बुकिंग रद्द झालं. इटालियन डेली रिपब्लिकानुसार, या जोडप्याने मोठ्या समारंभाची अपेक्षा केली नव्हती. त्यामळे त्यांनी जेरुसलेमच्या पवित्र शहरात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. येथील सामाजिक स्थितीमुळे त्यांना जरा अधिक सावध राहावं लागंल.

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर

“आम्हाला वर्षभरापूर्वीच येथे यायचं होतं. परंतु, ७ ऑक्टोबर रोजी येथे हल्ले सुरू झाले. इथल्या हवाई हल्ल्यांचा गगनभेदी आवाज विस्मरणात जाण्याच्या पलीकडचा आहे”, असं हे जोडपं म्हणालं.

हेही वाचा >> “बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!

हल्ल्यांमुळे आजूबाजूच्या वातावरणात दहशतीचं झालं आहे. परंतु, अशा परिस्थितीतही हे जोडपं एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून प्रेमरसात बुडून नृत्याचा आस्वाद घेत आहेत. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आजूबाजूच्या संघर्षमय वातावरणातही त्यांनी त्यांचा आनंद शोधल्याने अनेक नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय.

इराण-इस्रायल संघर्ष

इराण आणि इस्रायल हे परस्परांचे कट्टर शत्रू आहेत. तरीदेखील दोन्ही देशांनी बरीच वर्षे परस्परांवर थेट हल्ला करण्याचे टाळले होते. ती परिस्थिती या वर्षी एप्रिल महिन्यात बदलली. इराणने इस्रायलवर असंख्य छोटे अग्निबाण आणि ड्रोनचा मारा केला. इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल इराणच्या मोक्याच्या शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यात मनुष्यहानी झाली नाही आणि दोन्ही हल्ल्यांचे स्वरूप बरेचसे प्रतीकात्मक होते. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही. इराणने जवळपास १८० छोट्या ते मध्यम क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा इस्रायलवर केला. इमाद आणि घदर या क्षेपणास्त्रांबरोबरच यावेळी इराणने फत्ते – २ या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचाही वापर केला. इराणच्या हल्ल्यामागील एक कारण इस्रायलने हेझबोला नेता हसन नसरल्लाची हत्या केल्याबद्दल बदला घेण्याचे आहे. पण त्या हल्ल्यात इराणचा लष्करी उपप्रमुख पदावरील जनरल अधिकारी मारला गेला होता. शिवाय काही आठवड्यांपूर्वी इराणची राजधानी तेहरान येथे हमास नेता इस्मायल हानियेची हत्या इस्रायलने घडवून आणली होती. त्याबद्दलही इराणकडून प्रत्युत्तर अपेक्षित होते.