केंद्र सरकारने २०१९ साली जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य असल्याचं सांगत कलम ३७० रद्द ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. भाजपा सरकारच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची ठरली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी कलम ३७० रद्द केल्याने गेल्या चार वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये काय सकारात्मक चर्चा झाली याबाबत माहिती दिली आहे. तसंच, एका तरुण खेळाडूचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखात अफशा आशिक हिचा उल्लेख केला आहे. ती कधीकाळी श्रीनगरमधील दगडफेकीत सहभागी होती. परंतु, कलम ३७० रद्द झाल्यानंतर तिला तिच्यातील फुटबॉलचं कौशल्य दिसलं. तिला त्यानुसार प्रशिक्षण मिळालं आणि आज ती देशातील नामवंत फुटबॉलपटू आहे. याबाबत मोदी लिहितात, “क्रिडा क्षेत्रातील तरुणांची क्षमता लक्षात घेऊन आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध उपक्रम राबवले. विविध खेळांच्या माध्यमातून तेथील तरुणांच्या आकांक्षा आणि भविष्यात झालेले बदल आम्ही पाहिले आहेत. या दरम्यान विविध खेळांच्या जागांचं आधुनिकीकरण करण्यात आलं. प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. प्रशिक्षक उपलब्ध करून दिले. स्थानिक पातळीवर फुटबॉल क्लबची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या सर्वांचा परिणाम चांगला होती”, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Article 370 : ‘भारताला कोणताही अधिकार नाही’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची नाराजी

“मला प्रतिभाशाली फुटबॉल खेळाडू अफशा आशिक हिचं नाव आठवतंय. डिसेंबर २०१४ मध्ये ती दगडफेक करणाऱ्या समुहात होती. परंतु, योग्य प्रोत्साहन मिळाल्याने तिने फुटबॉल खेळासाठी प्रयत्न केले. तिला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. या खेळात तिने उत्कृष्ट कामगिरी केली. फिट इंडिया डायलॉग्स या कार्यक्रमात तिच्याबरोबर माझी भेट झाली होती. या भेटीत मी तिला म्हटलं होतं की, बेंड इट लाईक बेकहमच्या पुढे जाण्याची वेळ आली आहे. कारण आता लोक Ace it like Afshan (अफशाप्रमाणे निपुण व्हा)म्हणत आहेत. मला आनंद आहे की, आता तरुणांनी किकबॉक्सिंग, कराटे आणि इतर अनेक खेळात आपली प्रतिभा दाखवायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखातून काश्मीरमधील बदलती परिस्थिती यावर भाष्य केलं आहे. यातून त्यांनी तरुणांच्या आयुष्यात झालेल्या बदलाबाबत त्यांनी सकारात्मक बाब या लेखातून समोर ठेवली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A stone throwing girl to a football player narendra modi told the transformation of a kashmiri girl sgk