कीव्ह, पीटीआय : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी मारियुपोल या युक्रेनमधील शहराला अचानक भेट दिली. मारियुपोल हे शहर युक्रेनमधील बंदर असून ते १० महिन्यांपेक्षा जास्त काळापासून रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. पुतिन यांनी युक्रेनच्या भूभागाला दिलेली ही पहिलीच भेट आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने शुक्रवारी अटक वॉरंट बजावल्यानंतर आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यापूर्वी पुतिन यांनी हा दौरा केला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रशियातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अधिकृत व्हिडीओमध्ये पुतिन रात्रीच्या वेळी वाहन चालवताना आणि लोकांशी बोलताना दिसतात. पुतिन यांनी शनिवारी क्रिमिया या मारियुपोलच्या नैऋत्य दिशेला असलेल्या जवळच्या शहराला भेट दिली. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियावर ताबा मिळवला होता. मारियुपोलला जाण्याचा निर्णय पुतिन यांनी उत्स्फूर्तपणे घेतला असे रशियातर्फे सांगण्यात आले. हे शहर रशियन सैन्याच्या ताब्यात जाण्यापूर्वी तिथे अल्प संख्येने असलेल्या युक्रेन सैनिकांनी जोरदार संघर्ष केला होता, त्यामुळे ते युद्धातील युक्रेन सैन्याच्या शौर्याचे प्रतीक बनले आहे. या शहरातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त इमारतींचे नुकसान झाले असून जवळपास साडेतीन लाख लोकांनी शहर सोडले आहे असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. या शहराची पुनर्बाधणी करून तेथील रहिवाशांचे मन जिंकण्यासाठी रशिया प्रयत्नशील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.