रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एक सूचक विधान केलं आहे. लावरोव्ह यांनी बुधवारी तिसरं विश्वयुद्ध झालं तर ते नक्कीच अण्विक असेल असं म्हटलंय. “तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विद्धवंसक असेल,” असं लावरोव्ह म्हटल्याचं आरआयए या वृत्तसंस्थेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करताना किव्हला म्हणजेच युक्रेनला अण्वस्त्रं मिळाली तर ते रशियासाठी फार धोकादायक ठरु शकतं असं म्हटलं आहे. सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनकडे अणवस्त्र असण्याला रशियाला कायमच विरोध करेल असे संकेतही दिले आहेत.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

पुतिन यांनी युक्रेनच निर्लष्करीकरण करण्याचं कारण देत सात दिवसांपूर्वी युक्रेनवर हल्ला करत असल्याची घोषणा केलेली. तेव्हापासून रशियन लष्कराबरोबरच हवाईदल आणि नौदलाच्या मदतीने युक्रेनवर हल्ले करण्यात येत आहेत. आतापर्यंत यामध्ये हजारो लोक मरण पावली आहेत. तर लाखो लोकांनी युक्रेन सोडून पलायन केलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: बायडेन यांचा हल्लाबोल! म्हणाले, “पुतिन हुकूमशहा आहेत, ही लढाई…”

अण्वस्त्र सतर्कतेचे पुतिन यांचे आदेश
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चिमात्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २७ फेब्रुवारी रोजी अण्वस्त्र दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले. नाटो देशांच्या आक्रमक विधानांमुळे आपण हे आदेश दिल्याचे समर्थनही पुतिन यांनी केले. पुतिन यांनी अण्वस्त्र सतर्कतेचे आदेश देताना केवळ ‘नाटो’ देशांच्या कथित विधानांचाच नाही, तर पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांचाही उल्लेख केला.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

युद्धस्थिती काय?
रशियन सैन्याकडून हल्लासत्र तीव़ करण्यात आला असून मंगळवारपासून खार्कीव्हमध्ये तोफांचा मारा केला जातोय. या ठिकाणी गोळीबारात मोठी जिवीतहानी़ झाली आहे. किव्हमध्ये ६० किमीपर्यंत रणगाड्यांचा ताफा़ सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसून आलाय. किव्ह शहरात आणखी लक्ष्यभेदी हल्ल्यांचा इशारा रशियाने दिलाय. रशियाने तातडीने हे शहर सोडण्याचं आवाहन केलंय. रशियाने या शहरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना़ केलीय.युक्रेनमधून आतापर्यंत ६ लाख ७७ हजार नागरिकांचे शेजारच्या देशांत स्थलांतर केलं आहे. युरोप युक्रेनबरोबर आहे, हे सिद्ध करण्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे युरोपीय संसदेतील भाषणात आवाहन केलं आहे.

रशियाकडे किती अणु बॉम्ब?
रशियाकडे विविध क्षमतेचे अणु बॉम्ब आहेत. म्हणजे हिरोशिमा -नागासाकी वर टाकलेल्या अणु बॉम्बच्या संहारक शक्तीपेक्षा हजारपट शक्तीशाली अणुबॉम्ब रशियाकडे आहेत. गेल्या अनेक वर्षातले संशोधन आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या बॅगेत सहज राहील अशा आकाराचे, किरणोत्साराचे उत्सर्जन जास्त पण उष्णतेमुळे विध्वंस कमी होईल अशा प्रकारचे अणु बॉम्बही विकसित करण्यात आले आहेत. तेव्हा असेही अणु बॉम्ब रशियाकडे असावेत असा अंदाज आहे. एका अंदाजानुसार रशियाकडे सहा हजारांहून अधिक अणु बॉम्ब आहेत.

अणु बॉम्ब टाकण्यासाठीची सज्जता किती?
रशियाकडे १०० किलोमीटरपासून ते अगदी १० हजार किलोमीटरपेक्षा कितीतरी जास्त अंतरावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेली विविध क्षेपणास्त्रे आहेत. ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी विविध क्षमेतेचे अणु बॉम्ब वाहून नेऊ शकतात. गरज पडल्यास शत्रू प्रदेशातल्या भागात घुसत अणु बॉम्ब टाकणारी खास लढाऊ विमाने तसंच टीयू-१६० सारखी बॉम्बफेकी विमाने रशियाकडे आहेत. एवढंच नाही तर शत्रु हल्लाच्या पहिल्याच तडाख्यात जमिनीवरील प्रहार क्षमता नष्ट झाली तर पाण्याखालून क्षेपणास्त्र डागत हल्ला करु शकणाऱ्या विविध अणु पाणबुड्या रशियाकडे आहेत.

Story img Loader