पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात गोळय़ा झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडालेली असताना, आता सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांना धमकीचा मेल मिळाल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी मन्सा पोलिसांनी दिल्लीतून एका आरोपीला अटक केली आहे. आठवडाभरापूर्वी ही धमकी मेलद्वारे मिळाली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीवर या धमकीचा आरोप आहे.

मन्सा येथील एसएसपी गौरव तोरा यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, सिद्धू मूसेवाला यांच्या वडिलांना एक धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर आम्ही तत्काळ कारवाई केली आणि दिल्लीतून एका आरोपीस अटक केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी असा धमकीचा मेल पाठवला होता.

सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांनी या मेलच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही. माझा मुलगा देखील या गँगस्टर्सच्या धमक्यांना घाबरला नाही. तो सदैव ताठ मानेनेच जगला.

आपल्या मुलाच्या जिवाला धोका असल्याच्या भीतीमुळे आणि त्याने सुरक्षारक्षकांना सोबत न नेल्याने काळजीत पडलेले पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडील सुरक्षारक्षकांसह त्यांच्या मागोमाग गेले, मात्र आपला २८ वर्षांचा मुलगा गोळय़ांच्या वर्षांवाला बळी पडल्याचे दृश्य त्यांना स्वत:च्या डोळय़ांनी पाहावे लागले, असे प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) म्हटले आहे.

माझ्या मुलाला गँगस्टरकडून खंडणीसाठी धमक्या येत असत, असे हल्ल्यानंतर मूसेवाला व त्यांच्यासोबतच्या दोघांना रुग्णालयात नेणाऱ्या बलकौर सिंह यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.