पीटीआय, नवी दिल्ली

वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वीच केरळात मुसळधार पावसाची सूचना राज्य सरकारला देण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली. केंद्र सरकारने आपत्तीच्या काळात एनडीआरएफची ८ पथके २३ जुलै रोजी पाठविली होती, असे लक्षवेधी सूचनेवर बोलताना शहा म्हणाले. तर केरळ सरकारने पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष केले आणि एनडीआरएफ पथक पोहोचल्यानंतही सरकार सतर्क झाले नाही, ’ असा आरोप शहा यांनी राज्यसभेत लक्षवेधी सूचनेवर हस्तक्षेप करताना केला.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल

ज्यावेळी वायनाडमध्ये भूस्खलन झाले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून एनडीआरएफने त्वरित मदत व बचावकार्य सुरू केले. दरम्यान, मदत व बचावकार्यात सर्व दल सहभागी असून यात सीआयएसएफचाही समावेश असल्याचे शहा लोकसभेत म्हणाले. १८ जुलै रोजी केरळच्या पश्चिम किनाऱ्यावर सामान्यापेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज होता, अशी माहिती देतानाच २५ जुलै रोजीचा इशारा पाहून २३ जुलै रोजीच एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली, असे शहा म्हणाले.

हेही वाचा >>>Ban alcohol in Goa: गोव्यात दारूबंदी? भाजपाच्या आमदाराची मागणी; म्हणाले, “पर्यटक गोव्यात…”

लोकसभा तहकूब

‘वायनाडचे खासदार या नात्याने राहुल गांधी यांनी कधीही त्यांच्या मतदारसंघातील भूस्खलनाचा मुद्दा उपस्थित केला नाही’, असे वक्तव्य भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकसभेत केले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने बुधवारी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. देशाच्या विविध भागांमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे झालेल्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत लक्षवेधी मांडण्यात आली.

वायनाडच्या नागरिकांचा बचाव, मदत आणि पुनर्वसनासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. सहा वर्षांपूर्वीच आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांनी भूस्खलनप्रवण क्षेत्रातून नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Story img Loader