पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वीच केरळात मुसळधार पावसाची सूचना राज्य सरकारला देण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली. केंद्र सरकारने आपत्तीच्या काळात एनडीआरएफची ८ पथके २३ जुलै रोजी पाठविली होती, असे लक्षवेधी सूचनेवर बोलताना शहा म्हणाले. तर केरळ सरकारने पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष केले आणि एनडीआरएफ पथक पोहोचल्यानंतही सरकार सतर्क झाले नाही, ’ असा आरोप शहा यांनी राज्यसभेत लक्षवेधी सूचनेवर हस्तक्षेप करताना केला.
ज्यावेळी वायनाडमध्ये भूस्खलन झाले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून एनडीआरएफने त्वरित मदत व बचावकार्य सुरू केले. दरम्यान, मदत व बचावकार्यात सर्व दल सहभागी असून यात सीआयएसएफचाही समावेश असल्याचे शहा लोकसभेत म्हणाले. १८ जुलै रोजी केरळच्या पश्चिम किनाऱ्यावर सामान्यापेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज होता, अशी माहिती देतानाच २५ जुलै रोजीचा इशारा पाहून २३ जुलै रोजीच एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली, असे शहा म्हणाले.
हेही वाचा >>>Ban alcohol in Goa: गोव्यात दारूबंदी? भाजपाच्या आमदाराची मागणी; म्हणाले, “पर्यटक गोव्यात…”
लोकसभा तहकूब
‘वायनाडचे खासदार या नात्याने राहुल गांधी यांनी कधीही त्यांच्या मतदारसंघातील भूस्खलनाचा मुद्दा उपस्थित केला नाही’, असे वक्तव्य भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकसभेत केले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने बुधवारी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. देशाच्या विविध भागांमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे झालेल्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत लक्षवेधी मांडण्यात आली.
वायनाडच्या नागरिकांचा बचाव, मदत आणि पुनर्वसनासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. सहा वर्षांपूर्वीच आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांनी भूस्खलनप्रवण क्षेत्रातून नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री