आयकर विभागाने ‘पॅन कार्ड’ प्राप्त करण्याची प्रक्रिया सोपी केली असून, यापुढे ‘पॅन कार्ड’ मिळविण्यासाठी ‘मतदाता ओळखपत्र’ अथवा ‘आधार कार्ड’ असणे पुरेसे असणार आहे. केंद्रिय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) अलिकडेच याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. ‘पॅन कार्ड’ काढताना अर्जदाराची जन्म तारीख पडताळून पाहाण्यासाठी अर्जदाराचे ‘मतदाता ओळखपत्र’ अथवा ‘आधार कार्डा’चा पुरावा म्हणून वापर करता येणार आहे. आतापर्यंत ‘मतदाता ओळखपत्र’ आणि ‘आधार कार्डा’चा ओळखपत्र अथवा रहिवासी पुरावा म्हणून वापर होत होता. परंतु जन्म तारखेचा पुरावा म्हणून ही दोन्ही कार्ड ग्राह्य धरण्यात येत नव्हती. नव्या अधिसूचनेनुसार ‘पॅन कार्ड’ प्राप्त करण्यासाठी ‘मतदाता ओळखपत्र’ अथवा ‘आधार कार्डा’चा पुरेसे कागदपत्र म्हणून वापर करता येणार असल्याचे आयकर विभागातील एका जेष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या दोन्ही कार्डांद्वारे संबंधित व्यक्तिची ओळख, रहिवासी पुरावा आणि जन्म तारीख या तिन्ही गोष्टी पडताळून पाहाणे शक्य आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तिला ओळखीबाबतचे जरुरी पुरावे वेगवेगळ्या दस्तावेजांद्वारे सादर करण्याच्या जटील प्रक्रियेला छेद देत ही प्रक्रिया सोपी करण्यात आल्याचे त्याने सांगितले.
‘मतदाता ओळखपत्र’, ‘आधार कार्ड’ आणि ‘पॅन कार्ड’ची माहिती एका ठिकाणी आणण्यासाठी त्यांच्या आकड्यांची जोडणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी या अत्यावश्य दस्तावेजांची नक्कल उतरवून फसवेगिरी करण्याच्या प्रयत्नांना यामुळे संपुष्ट आणता येणार असल्याची माहिती त्याने दिली.
‘पॅन कार्ड’ काढण्यासाठी ‘मतदाता ओळखपत्र’ अथवा ‘आधार कार्ड’ पुरेसे
आयकर विभागाने 'पॅन कार्ड' प्राप्त करण्याची प्रक्रिया सोपी केली असून, यापुढे 'पॅन कार्ड' मिळविण्यासाठी 'मतदाता ओळखपत्र' अथवा 'आधार कार्ड' असणे पुरेसे असणार आहे.
First published on: 21-04-2015 at 07:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar or epic document enough to get pan card