दिल्लीत मागील वर्षी श्रद्धा वालकर हत्याकांड समोर आले होते. या खूनाने देशात एकच खळबळ उडाली होती. आफताब पूनावाला या तरूणाने प्रेयसी श्रद्धा वालकरचा खून करून मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. खूनानंतर चार ते पाच महिन्यांनी हे प्रकरण समोर आल्यावर आफताबला अटक झाली होती. सध्या याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गंभीर आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी ‘एएनआय’शी संवाद साधताना विकास वालकर यांनी सांगितले की, “आफताब पुनावालाच्या आई-वडीलांना लपवण्यात आले आहे. याप्रकरणात त्यांना समोर आणले पाहिजे. ते कुठे आहेत? त्यांना समोर आणण्याची मागणी करतो. तसेच, श्रद्धावर अंत्यसंस्कार करायचे आहे. त्यासाठी तिच्या मृतदेहाची मागणी केली आहे.”

हेही वाचा : पायलट यांच्या उपोषणाला ठरवलं पक्षविरोधी कृती, मुख्यमंत्री विरुद्ध माजी उपमुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा संघर्ष; नेमकं घडतंय काय?

“आफताब श्रद्धाच्या खूनप्रकरणी दोषी आहे. त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी. आफताबने पूर्णनियोजन करून श्रद्धाचा खून केला आहे. माझ्या वकिलाला फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण अपील करण्यात सांगितले आहे,” अशी माहिती विकास वालकर यांनी दिली.

हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : तपासाशी संबंधित बाबी उघड करण्यास वृत्तवाहिन्यांना मनाई

विकास वालकर यांच्या वकील सीमा कुशवाह यांनी म्हणाल्या, “निर्भया प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी सात वर्षे लागले होते. पण, लवकरात लवकर सुनावणी होत, आरोपीला शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaftab poonawalas parentshidden somewhere shraddha walkars fathers vikas walkar allegation ssa