दिल्ली मधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील निगडीत सुमारे ६३,००० जणांकडून १९ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती पक्षाने दिली आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सचिव व देणगी विभागाचे प्रमुख पंकज गुप्ता यांनी या संदर्भातील माहिती जाहीर केली. यात दहा रूपयांपासून ते काही लाखांपर्यंत निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
अगदी लहानसहान कामे करणाऱयांपासून ते व्यापारी, उद्योगपती तसेच अनिवासी भारतीयांपर्यंत अनेकांनी आम आदमी पक्षास निधी मिळाल्याचा दावा पक्षाने केला आहे. तसेच आगामी निवडणुक जिंकून दिल्लीत भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणण्याचा विश्वासही पक्षाने व्यक्त केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा